मुंबई: नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज (शनिवार) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज विधीमंडळात नेमकं काय घडणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं. मात्र, यासगळ्या दरम्यान, 'सामना'तून आज पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. 'फडणवीस यांच्या मानगुटीवर अद्याप सत्तेचे भूत स्वार झाले आहे. त्यामुळे त्यांचे मन मोकळे व्हायला वेळ लागेल.' अशा शब्दात फडणवीसांवर टीका करण्यात आले आहेत.
आजच्या सामनातील अग्रलेखातून भाजपवर प्रचंड टीका करण्यात आली आहे. 'शिवसेनेने भाजपचे ओझे फेकून दिल्याची घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आपल्यात आता कोणतेही नाते उरलेले नाही. नात्यांचेही तसे ओझेच होते. तेही उतरले.' असं म्हणत शिवसेनेने स्पष्ट केलं आहे की, यापुढे भाजपशी कोणतंही नातं ठेवण्यात येणार नाही.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.