दाऊदचं घर सोडलं, कंगनाचं ऑफिस तोडलं - फडणवीस

Shiv Sena don't go to demolish Dawood's home but demolished Kangana's place राज्यात तसेच मुंबई मनपात सत्तेत असलेल्या शिवसेनेवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली.

Shiv Sena don't go to demolish Dawood's home but demolished Kangana's place
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा 

थोडं पण कामाचं

  • दाऊदचं घर सोडलं, कंगनाचं ऑफिस तोडलं - फडणवीस
  • कंगना प्रकरणाला अवास्तव महत्त्व देऊ नये - फडणवीस
  • कंगना प्रकरणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात पहिल्यांदाच मुद्यांचा विरोध सरकारी यंत्रणेमार्फत तोडफोड करुन झाला - फडणवीस

मुंबईः राज्यात तसेच मुंबई मनपात सत्तेत असलेल्या शिवसेनेवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सडकून टीका केली. मुंबईतल्या दाऊदच्या (dawood ibrahim) मालकीच्या जागा तोडण्याची हिंमत न दाखवणाऱ्यांनी पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) हिचे ऑफिस तोडले, असा आरोप त्यांनी केला. (Shiv Sena don't go to demolish Dawood's home but demolished Kangana's place )

कोरोना संकट सुरू असल्यामुळे देशात महामारी कायदा लागू आहे. न्यायालयात हजर राहणे आणि पूर्ण क्षमतेने कामकाज चालवणे कठीण झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व न्यायालयांना महत्त्वाच्या प्रकरणांना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्थानिक पातळीवरच्या अनधिकृत बांधकामाच्या किरकोळ प्रकरणांमध्ये कारवाईची घाई करू नका अशा सूचना दिल्या आहेत. पण मुंबई मनपाने (Municipal Corporation of Greater Mumbai - MCGM) कंगना प्रकरणात कमाल वेगाने नोटीस बजावण्याची तसेच बांधकाम तोडण्याची कारवाई केली. ही कारवाई आणि आधीच्या घडामोडी यामुळे कारवाई सूडभावनेतून झाल्याचे मत व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची प्रतिक्रिया आली.

मुंबईत अनेक वर्षांपासून बेधडकपणे उभ्या असलेल्या असंख्य अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केले जाते अथवा त्यांना नोटीस दिली जाते. पण ही बांधकामं पाडण्याची घाई न करणाऱ्या मुंबई मनपाने कंगना प्रकरणात कमालीची तत्परता दाखवली. मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहीम याच्या मुंबईत अनेक मालमत्ता आहेत. मुंबईत दाऊदचे घर आहे. पण या बांधकामावर कारवाई न करणाऱ्या मनपाने कंगना प्रकरणात तडफेने काम केले. दाऊदचे घर सोडून कंगनाचे ऑफिस तोडले. 

मुंबई कोरोना संकटात आहे. पालिकेला या कालावधीत इतर अनेक कामांसाठी वेळ देणे शक्य झालेले नाही. पण कंगनाच्या घरातील बांधकाम हा विषय मुंबई मनपासाठी अचानक सर्वाधिक प्राधान्याचा झाला. 

कंगना कोणी राजकीय नेता नाही. तिचे वक्तव्य हा राष्ट्रीय अथवा राज्याच्या राजकारणाचा मुद्दा असू शकत नाही. पण सरकारच्या कृतीमुळे कंगना मोठी झाली. शिवसेनेने किरकोळी मुद्याला अवास्तव महत्त्व दिले. मुंबई मनपाने दाऊदचे घर सोडले, कंगनाचे ऑफिस तोडले, अशा स्वरुपाची प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. 

महाराष्ट्रात अनेकदा वैचारिक विरोधाचे प्रसंग घडले. पण विरोध आहे म्हणून कोणी कोणाचे ऑफिस अथवा घर तोडत नाही. कंगना प्रकरणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात पहिल्यांदाच मुद्यांचा विरोध सरकारी यंत्रणेमार्फत तोडफोड करुन झाला. या प्रकारामुळे राज्याचा अपमान झाला, असे फडणवीस म्हणाले. 

महाराष्ट्राला कोरोना संकटाशी लढायचे आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधीत महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यावे, याचा विचार होणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. राज्य सरकारने कोरोना संकटाला विसरुन कंगना प्रकरणाला अवास्तव महत्त्व देऊ नये, असेही फडणवीस म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी