Shiv Sena: शिवसेना कार्यकारिणीची बैठक संपली, बैठकीत नेमकं काय घडलं? वाचा...

मुंबई
सुनिल देसले
Updated Feb 21, 2023 | 22:07 IST

Shiv Sena executive meeting: निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची पहिली बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...

Shiv Sena executive meeting over read what decision taken in meet eknath shinde
Shiv Sena: शिवसेना कार्यकारिणीची बैठक संपली, बैठकीत नेमकं काय घडलं? वाचा... 
थोडं पण कामाचं
  • शिवसेना मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदे असणार
  • सर्व अधिकार शिंदेंकडे असणार

Shiv Sena executive meeting decisions: शिवसेनेची पहिली राष्ट्रकार्यकारिणीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर उदय सामंत यांनी पत्रकारांना संबोधित करत बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत माहिती दिली. उदय सामंत यांनी म्हटलं, संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीत पक्षाची वाटलाच कशी असेल या संदर्भात ठराव झाले. शिवसेना मुख्यनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली असून सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडेच असणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जे सरकार काम करत आहे त्या कामाची नोंद घेण्यात आली आणि त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा. महाराष्ट्रातील भूमीपूत्रांना 80 टक्के नोकऱ्या देणार.

हे पण वाचा : Exam Tips:परीक्षेच्या वेळी करू नका या चुका

या बैठकीत शिंदे गटाचे सर्व आमदार, प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर उदय सामंत यांनी माहिती देताना म्हटलं, शिस्तभंग समितीची एक स्थापना करण्यात आली आहे. या समितीचं अध्यक्षपद हे मंत्री दादा भुसे यांना देण्यात आले आहे. मंत्री शंभूराज देसाई आणि सदस्य म्हणून संजय मोरे अशी 30 जणांची समिती आहे. पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई किंवा पक्षाच्या विरोधात कुणी कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर शिस्तभंग होईल का याची छाणणी करण्यासाठी याची आखणी करण्यात आली आहे.

हे पण वाचा : दररोज एक संत्री खायला हवी का?

शिवसेनेच्या कार्यकारिणीतील निर्णय

  1. शिवसेना मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदे असणार
  2. सर्व अधिकार शिंदेंकडे असणार
  3. शिवसेना सचिवपदी सिद्धेश रामदास कदम यांची नियुक्ती
  4. निवडणूक आयोगाने केलेल्या नियमावलीचं पालन आमदारांनी करावं
  5. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा
  6. महाराष्ट्रातील भूमीपूत्रांना 80 टक्के नोकऱ्या देणार
  7. राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज, अहिल्याबाई यांचा महापुरुषांच्या यादीत समावेश करावा
  8. उठाव ज्यासाठी केला तशी चूक पुन्हा होऊ नये याचाही ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला
  9. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा याचाही ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला
  10. चर्चगेट रेल्वे स्टेशनला माजी केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख यांचं नाव देणे
  11. यूपीएससी आणि एमपीएससीच्या मराठी मुलांना भक्कम पाठिंबा देणे
  12. गड, किल्ले संवर्धन करण्याचा ठराव

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी