शिवसेना काँग्रेस-एनसीपीची बी टीम की सी टीम

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 06, 2022 | 18:28 IST

Shiv Sena is Congress-NCP B Team or C Team Question asked by Devendra Fadnavis : शिवसेना काँग्रेस-एनसीपीची बी टीम की सी टीम असा प्रश्न महाराष्ट्राचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. 

Shiv Sena is Congress-NCP B Team or C Team Question asked by Devendra Fadnavis
शिवसेना काँग्रेस-एनसीपीची बी टीम की सी टीम  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • शिवसेना काँग्रेस-एनसीपीची बी टीम की सी टीम
  • शिवसेनेने आधी स्वतःचे काय सुरू आहे हे बघणे आवश्यक
  • शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद असले तरी त्यांच्या पक्षाला राजकीय पातळीवर इतर कोणतेही लाभ होताना दिसत नाही

Shiv Sena is Congress-NCP B Team or C Team Question asked by Devendra Fadnavis : मुंबई : शिवसेना काँग्रेस-एनसीपीची बी टीम की सी टीम असा प्रश्न महाराष्ट्राचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. 

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आहे. शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांसोबत आघाडी केली आहे. या सगळ्याचा राग काढण्यासाठी भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या संदर्भात प्रश्न विचारला असता फडणवीस यांनी शिवसेना काँग्रेस-एनसीपीची बी टीम की सी टीम असा प्रतिप्रश्न उपस्थित केला.

केंद्रीय तपास यंत्रणा कायद्याचे पालन करून त्यांचे काम करत आहेत. हे विषय न्यायालयाच्या कक्षेत आहेत यामुळे न्यायालय त्यावर बोलेल. पण दोन वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी शिवसेनेकडून संजय राऊत बोलत असतात. यामुळे शिवसेना काँग्रेस-एनसीपीची बी टीम की सी टीम असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.

दोन वर्षांत झालेल्या निवडणुकांच्या निमित्ताने तसेच सरकारी बजेटमधील तरतुदींच्या निमित्ताने महाविकास आघाडीत जास्त लाभ हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन पक्षांना होताना दिसत आहे. शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद असले तरी त्यांच्या पक्षाला राजकीय पातळीवर इतर कोणतेही लाभ होताना दिसत नाही. शिवसेनेची ताकद कमी होताना दिसत आहे. या सगळ्याचा विचार करता शिवसेनेने आधी स्वतःचे काय सुरू आहे हे बघणे आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले. संजय राऊत सतत बोलत असतात त्याकडे किती लक्ष द्यावे, असा प्रतिप्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी