Sanjay Raut: 'हातातले खंजीर बाजूला ठेवा अन्...', राऊतांची CM शिंदेवर बोचरी टीका

मुंबई
रोहित गोळे
Updated Nov 16, 2022 | 14:32 IST

Sanjay Raut Vs CM Shinde: 'हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि मग स्मारकाला हात जोडायला जा,' अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

shiv sena leader sanjay raut criticized chief minister eknath shinde
'हातातले खंजीर बाजूला ठेवा अन्...', राऊतांची CM शिंदेवर बोचरी टीका 
थोडं पण कामाचं
  • संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना पुन्हा एकदा दिली खंजीरची आठवण
  • राऊतांची टीका शिंदेंना झोंबणार?
  • संजय राऊतांच्या टीकेला मुख्यमंत्री काय उत्तर देणार?

Sanjay Raut Criticized to CM Shinde: मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळावर अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत. याच गोष्टीवरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला लगावला आहे. 'हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि मग स्मारकाला हात जोडायला जा,' अशी बोचरी टीका राऊतांनी केली आहे. (shiv sena leader sanjay raut criticized chief minister eknath shinde)

पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले? 

'बाळासाहेब ठाकरे हे ठाकरे या देशाचे आणि विश्वाचे आहेत. फक्त आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि मग स्मारकाला हात जोडायला जा. कोणीही असतील ते.. मी कोणाचं व्यक्तिगत नाव घेत नाही.'

अधिक वाचा: शिंदे गटातील खासदारांची संख्या किती वाढणार?, गिरीश महाजनांनी सांगितला खरा आकडा

'आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद घ्या. बाळासाहेब हे अशी आत्मा आहेत की, जे सगळं पाहतायेत.. काय-काय होतंय ते आणि काय होणार आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत जी लोकं खंजीर खुपसतात त्यांचं कधीही भलं झालेलं नाही हा इतिहास आहे.'

'यासाठी मी एवढंच म्हणेन की, सगळे जण जाऊ शकतात बाळासाहेबांच्या स्मारकावर. पण चांगल्या मनाने जा.'

https://www.youtube.com/watch?v=9JE77AOrAUQ&t=3s

अशा शब्दात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. आता राऊतांच्या या टीकेला मुख्यमंत्री शिंदे किंवा त्यांच्या गटाचे नेते काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अधिक वाचा: भाजपचं टार्गेट जितेंद्र आव्हाड, चक्रव्यूहात अडकणार?

2019 विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली होती. शिवसेनेने केलेला हा राजकीय वार भाजपच्या प्रचंड जिव्हारी लागला होता. ज्यामुळे शिवसेनेला त्याच पद्धतीने उत्तर देण्यासाठी भाजपने देखील तयारी केली.

अखेर 2022 साल उजाडताच भाजपने महाविकास आघाडी सरकार उलथवण्यासाठी आपली संपूर्ण रणनिती आखली. याच वेळी त्यांच्या गळाला लागले ते शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे.

एकीकडे विधानपरिषदची निवडणूक पार पडत असतानाच दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 40 आमदारांनी बंडखोरी केली आणि ठाकरे सरकार कोसळलं. मात्र, ठाकरे सरकार ज्या पद्धतीने कोसळलं त्यानंतर शिवसेनेच्या काही नेत्यांनी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं म्हणत जोरदार टीका केली. यामुळे आता देखील संजय राऊत त्याच पद्धतीची टीका करत असल्याचं यावेळी पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी