Shiv Sena MLA Ramesh Latke dies in Dubai : मुंबई : अंधेरी पूर्व येथील शिवसेना आमदार रमेश लटके यांचा दुबई येथे मृत्यू झाला. रमेश लटके ५२ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.
प्राथमिक वृत्तानुसार रमेश लटके सहकुटुंब दुबईत गेले होते. कुटुंबातील सदस्य दुबईत शॉपिंगसाठी बाहेर गेले असताना लटके यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यासाठी हालचाली सुरू आहेत.
रमेश लटके यांनी २०१४च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सुरेश शेट्टी यांचा पराभव केला होता. यानंतर २०१९ मध्ये रमेश लटके यांनी अपक्ष उमेदवार एम. पटेल यांचा पराभव केला होता. आमदार होण्याआधी रमेश लटके मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक होते.
काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत कार्यक्रमस्थळी पोहचण्याच्या थोडा वेळ आधी माइकवर बोलत असताना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे युवक काँग्रेस नेते मोहब्बत सिंह यांचा मृत्यू झाला होता. याआधी पश्चिम बंगालचे मंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुब्रत मुखर्जी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सुब्रत मुखर्जी ७५ वर्षांचे होते.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.