शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हॉटेल ट्रायडंटमध्ये नसून तर 'या' हॉटेलमध्ये

Shiv Sena MLA Sawant is not in Hotel Trident : आमदार तानाजी सावंत मात्र, हॉटेल ट्रायडंटमध्ये दिसले नाहीत. त्यामुळे, आमदार सावंत हे नाराज असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या. दरम्यान, तानाजी सावंत हे नाराज नसून, मतदानला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Shiv Sena MLA Sawant is not in Hotel Trident
शिवसेनेचे आमदार सावंत हॉटेल ट्रायडंटमध्ये नसून तर या हॉटेलात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सावंत हे हॉटेल ट्रायडंटमध्ये सर्व आमदारांसोबत नसून विधान भवनाजवळील हॉटेल मरीन प्लाजा या हॉटेलमध्ये
  • तानाजी सावंत हे गेल्या २ दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा
  • तानाजी सावंत यांनी सत्ताबदलाचा इशारा दिल्याचा व्हिडीओ झाला होता व्हायरल

मुंबई – शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे गेल्या २ दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा होत्या. कारण, राज्यसभेच्या निवडणूसाठी मुंबई येथील हॉटेल ट्रायडंटमध्ये एकत्र जमले असताना, यावेळी आमदार तानाजी सावंत मात्र, हॉटेल ट्रायडंटमध्ये दिसले नाहीत. त्यामुळे, आमदार सावंत हे नाराज असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या. दरम्यान, तानाजी सावंत हे नाराज नसून, मतदानला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. सावंत हे हॉटेल ट्रायडंटमध्ये सर्व आमदारांसोबत नसून विधान भवनाजवळील हॉटेल मरीन प्लाजा या हॉटेलमध्ये थांबले आहेत अशी देखील माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

अधिक वाचा : या आयटी कंपनीच्या शेअरमध्ये हजार गुंतवून 900 कोटींची कमाई

तानाजी सावंत यांनी सत्ताबदलाचा इशारा दिल्याचा व्हिडीओ झाला होता व्हायरल

तानाजी सावंत हे  भूम परंडा वाशीचे शिवेसेने आमदार आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी तानाजी सावंत यांनी सत्ताबदलचा सुचक इशारा दिला होता, ते अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरु होती. दरम्यान, तानाजी सावंत यांनी सत्ताबदलाचा इशारा दिल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यावर तानाजी सावंत हे पक्ष सोडणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, मी शिवसेना पक्षात आहे. पक्षाने माझ्यावर दिलेली जबाबदारी मी सजग होऊन पार पाडत आहे. मी शिवसेना पक्षातच राहणार आहे असा खुलासा तानाजी सावंत यांनी केला होता. तसेच बदनामीसाठी हे सारं केलं जात असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला होता.

अधिक वाचा : वारंवार शौचास जावे लागत असेल तर या 5 प्रकारे शिजवलेला भात खा 

शिवसेना आमदारांची कामे होत नसल्यानेही काही शिवसेना आमदारांमध्ये छुपी नाराजी

तानाजी सावंत हे युती सरकारमध्ये मंत्री होते त्याचबरोबर ते उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. मात्र, शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेससोबत झालेल्या महाविकासआघाडी सरकारमुळे अनेकांना मंत्री पदापासून दूर राहावे लागले आहे. तानाजी सावंत यांचा देखील त्यावेळी पत्ता कट झाला होता. तेव्हापासून ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर शिवसेना आमदारांची कामे होत नसल्यानेही काही शिवसेना आमदारांमध्ये छुपी नाराजी असल्याचं दिसून येत होत. त्यातूनच आमदार तानाजी सावंत यांनी हे वक्तव्य केले असावे असा अदांज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. 

अधिक वाचा  : नारायण राणे यांनी काढली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लायकी?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी