मुंबई :काही वेळापूर्वी भूम – परंडा – वाशीचे आमदार तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद – कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांच्यावर गंभीर आरोपी केले होते, सावंत यांनी कैलास पाटील यांना मुंबईपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था आम्ही केली होती असं म्हटलं होत. तानाजी सावंत यांनी केलेल्या आरोपानंतर आमदार कैलास पाटील यांनी काल म्हणल्याप्रमाणे ट्रकमध्येचं प्रवास केला असल्याचं उघड झालं आहे. कारण, कैलास पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे ज्या ट्रकमध्ये प्रवास केला आहे. कैलास पाटील यांनी ज्या ट्रकमध्ये प्रवास केला त्या ट्रकचा आणि ट्रक ड्राईव्हर सोबतचा फोटो आता टाइम्स नाऊच्या हाती लागले आहेत. त्यामुळे आमदार तानाजी सावंत यांनी लावलेले आरोप हे चुकीचे असल्याचं बोललं जाऊ लागले आहे.
अधिक वाचा : आमदार कैलास पाटलांवर तानाजी सावंत यांनी केले गंभीर आरोप
उस्मानाबाद येथील शिवसेना आमदार कैलास पाटील यांना एकनाथ शिंदे यांनी जाळ्यात ओढून सुरतला नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ते हुलकवणी देत वाटेतून निसटले, त्यांनी चिखलातून वाट काढत थोडा प्रवास केला. त्यानंतर त्यांनी एका दुचाकी गाडीला हात करत २ किलोमीटरचा प्रवास केला. त्यानंतर आमदार कैलास पाटील यांनी एका ट्रकला हात केला मात्र, रात्रीच्या वेळी कोणीही गाडी थांबवत नव्हत. थोड पुढे आल्यानंतर त्यांना एका ट्रकवाल्याने आपल्या गाडीत बसवले आणि ते मुंबईपर्यंत आले. पुढे आपल्यानंतर कैलास पाटील यांनी आपला मोबाईल बंद चालू केला. आपला जीव धोक्यात घालून कैलास पाटील त्या सर्वाना गुगारा देत रात्रीतून वर्षा बंगला गाठला.
अधिक वाचा ; गुवाहाटीत चाललंय काय? शिंदेंच्या गटातील दोन आमदार हॉटेलबाहेर
शिवसेनेतील काही आमदारांना घेऊन सत्तातर करण्याचा मनसूबा शिंदे यांचा असल्याच बोलले जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार डॉ तानाजीराव सावंत व आमदार ज्ञानराज चौगुले हे नॉट रिचेबल असून ते शिंदे यांच्या गोटात गेल्याची चर्चा आहे.
अधिक वाचा :शिवसेना मविआतून बाहेर पडणार, राऊतांनी दिली बंडखोरांना ऑफर
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.