Shivsena: सत्ताधारी शिवसेना पिक विम्यासाठी १७ जुलैला मुंबईत काढणार मोर्चा

मुंबई
Updated Jul 11, 2019 | 18:31 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Shivsena: विमा कंपन्यांनी पिक विमा योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करावी, या मागणीसाठी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. १७ जुलैला मोर्चा काढण्यात येणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सांगितले.

 Udhav Thakrey file photo
पिक विम्यासाठी शिवसेना काढणार मोर्चा (उद्धव ठाकरे फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • शिवसेना सदैव शेतकऱ्यांच्या बाजूने : उद्धव ठाकरे
  • पिक विम्यासाठी शिवसेना उतरणार रस्त्यावर
  • शेतकरी हिताच्या आड येऊ नका; उद्धव ठाकरेंचा इशारा

मुंबई : राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेली शिवसेना आता शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहे. विमा कंपन्यांनी पिक विमा योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करावी, या मागणीसाठी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. येत्या १७ जुलैला मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील विमा कंपन्यांच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येईल, अशी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत दिली. शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मोर्चाचा उद्देश सांगितला. पिक विमा योजनेची अंमलबजावणी नीट करण्यासाठी कंपन्यांना या मोर्चाच्या माध्यमातून इशारा देण्यात असून, हे आंदोलन नसल्याचे ठाकरे यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. पिक विम्या संदर्भातील सर्व प्रकरणे निकालात काढण्याची शिवसेनेची मागणी आहे. मोर्चानंतर प्रकरणे निकाली निघाली नाहीत तर, ‘शिवेसना स्टाईल’ने विमा कंपन्यांशी संवाद साधला जाईल, असा इशाराही ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

 

‘शेतकऱ्यांच्या हिताच्या आड येऊ नका’

ठाकरे म्हणाले, ‘केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना राज्यातील तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. यात अडथळा आणून झारीतील शुक्राचार्य बनत असेल तर, त्याचा बंदोबस्त करू. शिवसेनेसाठी राज्यात शेतकरी महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या आड कोण येत असेल तर, त्यांना शिवसेना धडा शिकवेल. विमा कंपन्यांना सरकारी भाषा समजत नाही. त्यामुळं त्यांना शिवसेनेच्या भाषेतच समजावून सांगावे लागेल. वसेना यापूर्वीही शेतकऱ्यांसोबत होती आणि आजही शेतकऱ्यांच्या सोबत आहे. त्यांच्याबद्दलचे ऋण व्यक्त करण्यासाठी आम्ही मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर येत आहोत.’ शिवसेनेचे हे प्रतिकात्मक आंदोलन असून, विमा कंपन्यांशी शिष्टमंडळ संवाद साधणार असल्याची माहिती ठाकरे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली.

योजनेतील त्रुटी दूर करणार

शेतकऱ्यांना कागदोपत्री कर्ज माफी झाली. पण, प्रत्यक्षात झाली नाही. अजूनही बँका कर्जासाठी शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावत आहेत. बँका शेतकऱ्यांच्या दारांवर नोटीस लावते. पण, कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची नावे संबंधित बँकांच्या दारांवर लावायला हवीत, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

ठाकरे म्हणाले, ‘राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी पिक विमा योजनेपासून वंचित आहे. शिवसेनेने तज्ज्ञांकडून याची माहिती घेतली आहे. त्यामुळेच पिक विमा योजनेची अंमलबजावणी नीट व्हावी आणि त्याला लाभ शेतकऱ्यांना मिळाला यासाठी आम्ही आग्रही आहोत.’ पिक विमा योजनेत काही त्रुटी असल्याचेही ठाकरे यांनी यावेळी मान्य केले. या त्रुटींची माहिती सरकारला देऊन त्या दूर करण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Shivsena: सत्ताधारी शिवसेना पिक विम्यासाठी १७ जुलैला मुंबईत काढणार मोर्चा Description: Shivsena: विमा कंपन्यांनी पिक विमा योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करावी, या मागणीसाठी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. १७ जुलैला मोर्चा काढण्यात येणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सांगितले.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles