शिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा राजीनामा; आजारपणात पक्ष नेतृत्वाचा साधा फोनही नाही, खासदाराकडून खंत व्यक्त

मुंबई
भरत जाधव
Updated Jul 07, 2022 | 08:13 IST

शिवसेनेला झटका देणारी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Andandrao Adsul) हे आता बंडखोर शिंदे गटाच्या मार्गावर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. माजी खासदार अडसूळ (Anandrao Adsul) यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामाही उद्धव ठाकरेंकडे पाठवला आहे.

Former Shiv Sena MP Anandrao Adsul resigns
शिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा राजीनामा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अडचणीच्या काळात पक्ष आणि नेतृत्व पाठिशी न राहिल्याची भावना अडसूल यांनी व्यक्त केली.
  • अमरावतीच्या सिटी बँकेत अनियमितता झाल्याच्या आरोपावरून ईडीने शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या घरी धाड टाकली होती.
  • आनंराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ एकनाथ शिंदे गटात आधीपासूनच आहेत.

मुंबई : शिवसेनेला झटका देणारी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Andandrao Adsul) हे आता बंडखोर शिंदे गटाच्या मार्गावर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. माजी खासदार अडसूळ (Anandrao Adsul) यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामाही उद्धव ठाकरेंकडे पाठवला आहे. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) नेतेपदाच्या राजीनाम्याचं पत्र पाठवलं आहे. अडचणीच्या काळात पक्ष आणि नेतृत्व पाठिशी न राहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी ईडीने केलेल्या कारवाईवेळी पक्ष नेतृत्वाकडून आजारपणात साधी विचारपूसही न केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

अडसूळ यांनी दिलेलं कारण हे अगदी वरवरचे दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून काही खासदार देखील त्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. दरम्यान, आनंराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ एकनाथ शिंदे गटात आधीपासूनच आहेत. त्यामुळे आता आनंदराव देखील त्यांच्यासोबत जावून मिळणार असल्याची चर्चा आहे. अमरावतीच्या सिटी बँकेत अनियमितता झाल्याच्या आरोपावरून ईडीने शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या घरी धाड टाकली होती. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याची दाट शक्यता होती.

मात्र, अचानक प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तरीही ईडीचे अधिकारी तब्बल 14 तास रुग्णालयात तळ ठोकून होते. अखेर अधिकारी तिथून निघून गेले होते. विशेष म्हणजे ईडीने अडसूळ यांना चौकशीसाठी अनेकदा समन्स बजावले होते. पण ते चौकशीसाठी हजर राहू शकले नव्हते.

Read Also : घरात ठेवलेली मूर्ती भंग पावली तर? कुटुंबावर संकट येतात का?

दरम्यान, आनंदरावर अडसूळ यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांना सध्यातरी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाकडून अडचणींच्या काळात साधा फोन करुन विचारपूसही करण्यात आली नाही म्हणून आनंदराव नाराज आहेत. त्यातूनच त्यांनी उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र पाठवलं आहे. या पत्रावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेतात, ते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

शिवसेनेतील खासदार शिंदेंच्या गटात सामील होणार

मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या गटात ११ शिवसेनेचे खासदार सहभागी होणार आहेत अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. राज्यात शिवसेनेचे १८ खासदार आहेत त्यापैकी ११ खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यापैकी एक म्हणजे आनंदराव अडसूळ.  
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी