Shiv Sena: शिवसेना खासदारांची 'मातोश्री'वर बैठक; 18 खासदारांपैकी ६ अनुपस्थित, कोण हजर, कुणाची दांडी? वाचा संपूर्ण यादी

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 11, 2022 | 14:36 IST

Shiv Sena MP's meeting at Matoshree: शिवसेनेच्या खासदारांची मुंबईत बैठक बोलावली आहे. मात्र, या बैठकीला सहा खासदार अनुपस्थितीत आहेत.

Shiv Sena MP meeting at matoshree but out of 18 member of parliament 6 mp absent read full list
खासदारांची 'मातोश्री'वर बैठक; 18 खासदारांपैकी ६ अनुपस्थित, वाचा संपूर्ण यादी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • मातोश्रीवर शिवसेना खासदारांची महत्त्वाची बैठक 
 • राज्यातील १८ खासदारांपैकी केवळ १२ खासदारच उपस्थित
 • सहा खासदार बैठकीला अनुपस्थित, काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा 

मुंबई : शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनेचे खासदार सुद्धा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आज शिवसेनेच्या राज्यातील सर्व खासदारांची एक महत्त्वाची बैठक मातोश्री (Matoshree) या निवासस्थानी बोलवण्यात आली आहे. गेल्या तासाभरापासून ही बैठक सुरू आहे. मात्र, या बैठकीत शिवसेनेचे ६ खासदार अनुपस्थित आहेत. (Shiv Sena MP's absent in meeting)

राज्यातील ४८ जागांपैकी शिवसेनेचे एकूण १८ खासदार आहेत. या खासदारांपैकी एकूण १२ खासदार मातोश्रीवर उपस्थित आहेत. तर सहा खासदार अनुपस्थित आहेत. हे खासदार नेमक्या कुठल्या कारणामुळे अनुपस्थित आहेत याची माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र, कल्याण-डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे वडील एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि ते सुद्धा या बंडात सहभागी झाले आहेत. तर शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना पक्षाने प्रतोद पदावरून काढल्याने ते सुद्धा शिंदे गटात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

तर इतर खासदार, संजय मंडलिक, संजय जाधव, हेमंत पाटील, कृपाल तुमाने तसेच दादरा नगर हवेलीच्या कलाबेन डेलकर हे खासदार अनुपस्थित का आहेत या मागचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्म यांना पाठिंबा द्यायचा की नाही या संदर्भात ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत निर्णय झाल्यावर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवण्यात येणार आहे.

हे पण वाचा : अन् दोन वर्षाच्या भावाचा मृतदेह मांडीवर घेऊन बसला चिमुकला

शिवसेनेच्या एकूण १९ लोकसभा खासदारांपैकी १२ खासदार बैठकीला उपस्थित तर ७ खासदार अनुपस्थित

उपस्थित खासदार

 1. गजानन कीर्तिकर
 2. अरविंद सावंत
 3. विनायक राऊत
 4. हेमंत गोडसे
 5. धैर्यशील माने
 6. प्रताप जाधव
 7. सदाशिव लोखंडे
 8. राहुल शेवाळे
 9. श्रीरंग बारणे 
 10. राजन विचारे
 11. ओमराजे निंबाळकर 
 12. राजेंद्र गावीत 

शिवसेनेचे अनुपस्थित  खासदार

 1. यवतमाळ-वाशिम - भावना गवळी
 2. परभणी - संजय जाधव
 3. कोल्हापूर - संजय मंडलिक
 4. हिंगोली - हेमंत पाटील
 5. कल्याण-डोंबिवली - श्रीकांत शिंदे
 6. रामटेक - कृपाल तुमाने
 7. दादरा-नगर हवेली - कलाबेन डेलकर

राज्यसभा खासदार उपस्थित

 1. संजय राऊत 
 2. प्रियांका चतूर्वेदी

अनिल देसाई (दिल्लीला आहेत)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी