सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या 'त्या' याचिकेवर तातडीची सुनावणी होणार नाही

मुंबई
पूजा विचारे
Updated Nov 13, 2019 | 14:15 IST

शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात तातडीनं सुनावणी होणार नाही आहे. सत्तास्थापनेसाठी संख्याबळ सादर करण्यास मुदतवाढ न देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली

kapil sibbal and uddhav thackeray
सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या 'त्या' याचिकेवर सध्या तरी तातडीची सुनावणी होणार नाही  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात तातडीनं सुनावणी होणार नाही आहे.
  • सत्तास्थापनेसाठी संख्याबळ सादर करण्यास मुदतवाढ न देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
  • मंगळवारी ही याचिका शिवसेनेनं दाखल केली होती. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच बुधवारी याचिका दाखल करावी असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं होतं.

शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात तातडीनं सुनावणी होणार नाही आहे. सत्तास्थापनेसाठी संख्याबळ सादर करण्यास मुदतवाढ न देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज्यातील सत्ता संघर्षात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नैसर्गिक न्याय मिळाला नाही, या मुद्यावरून शिवसेनेने राज्यपालांच्या निर्णयाविरूद्ध थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 

मंगळवारी ही याचिका शिवसेनेनं दाखल केली होती. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच बुधवारी याचिका दाखल करावी असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं होतं. पण आता शिवसेनेचे वकील सुनील फर्नांडिस यांनी नव्यानं याचिका दाखल करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेची बाजू ही काँग्रेस नेते आणि सुप्रसिद्ध वकील कपिल सिब्बल मांडणार आहेत. न्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. पण आता न्यायालयानं तातडीनं या प्रकरणी सुनावणी करण्यास नकार दिला आहे. 

 

 

सत्ता स्थापनेची चाचपणी करण्यासाठी भाजपला ९ तारखेला ७.३० वाजता बोलविण्यात आले. त्यानंतर ११ तारखेच्या ७.३० वाजेपर्यंत त्यांना मुदत देण्यात आली होती. त्यामुळे हा काळ ४८ तासांचा होता. तर शिवसेनेला सत्ता स्थापनेची चाचपणी करण्यासाठी केवळ २४ तासांचा अवधी देण्यात आला. त्यामुळे नैसर्गिक न्याय पायदळी तुडवला गेला असल्याची भावना शिवसेनेची व्यक्त केली आहे. 

या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कपिल सिब्बल यांच्याशी तसेच अहमद पटेल यांच्याशी संपर्क साधला होता. राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी दिलेली २४ तासांची मुदत कमी होती. तसेच वेळ वाढवून मागितल्यावर हा वेळ वाढवून देण्यात आलेला नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टातील वरीष्ठ वकिलांचा सल्ला घेऊन ही याचिका दाखल करण्यात आली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी