उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का? सेनेचा ४१ वा आमदार फुटणार अन् शिंदे गटात सहभागी होणार असल्याची चर्चा

Maharashtra Politics: शिवसेनेत बंडखोरी झाल्याने राज्यात एक राजकीय भूकंप आला. त्यानंतर आता शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याच दरम्यान आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. 

Shiv Sena one more mla from konkan may join Eknath Shinde camp read details in marathi
सेनेचा ४१ वा आमदार फुटणार अन् शिंदे गटात सहभागी होणार? 
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेला लागलेली गळती कधी थांबणार? 
  • आणखी एक आमदार शिंदे गटात सहभागी होणार असल्याची चर्चा
  • शिंदे गटातील आमदारांच्या संख्येत वाढ होणार? 

Shiv Sena MLA may join Shinde camp: शिवसेनेत बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. नगरसेवकांपासून ते खासदारांपर्यंत अनेकजण एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा देत आहेत. शिवसेनेत झालेली ही बंडाळी आतापर्यंतची सर्वात मोठी बंडखोरी ठरली आहे. त्यातच आता उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आणखी एक झटका बसणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचं कारण म्हणजे शिवसेनेतील आणखी एक आमदार शिंदे गटात सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

कोकणातील एक आमदार शिंदे गटात सहभागी होणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. कोकणात शिवसेनेचे एकूण नऊ आमदार आहेत. त्यापैकी सावंतवाडीचे दीपक केसरकर, अलिबागचे महेंद्र दळवी, महाडचे भरत गोगावले, पनवेलचे आमदार महेंद्र थोरवे, रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि दापोलीचे आमदार योगेश कदम हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. तर मालवणचे आमदार वैभव नाईक, गुहागरचे आमदार भास्कर जाधव आणि राजापूरचे आमदार राजन साळवी हे अद्यापही ठाकरेंसोबतच आहेत. मात्र, याच तिघांपैकी एक आमदार शिंदे गटात सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

झालं असं की, मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशना दरम्यान शिवसेनेचे आमदार राजन साळवी (Shiv Sena MLA Rajan Salavi) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमागे शिंदे गटात सहभागी होण्याचं कारण आहे की अन्य कारण आहे हे स्पष्ट झालेलं नाहीये मात्र, राजन साळवी शिंदे गटात सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

अधिक वाचा : "राष्ट्रवादीतला एक मोठा नेता लवकरच देशमुख, मलिकांना भेटणार"

त्याच कारण म्हणजे, कोकणाातील रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी विरोध केला आहे.मात्र, आमदार राजन साळवी हे या प्रकल्पाचं समर्थन करत आहेत. काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देत रिफायनरीच्या संदर्भात स्थानिक आमदाराचे मत आणि भूमिका महत्त्वाची असल्याचं म्हटलं होतं. तसेच रिफायनरी प्रकल्पामुळे रोजगार निर्मितीही होईल. त्यामुळेच राजन साळवी यांनी घेतलेली देवेंद्र फडणवीस यांची भेट ही खूप महत्त्वाची मानली जात आहे.

अधिक वाचा : 'मोहित कंबोजांचा स्ट्राईक रेट १०० टक्के'

काय म्हणाले राजन साळवी?

दरम्यान शिवसेनेचे आमदार राजन साळवी हे शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या वृत्तानंतर साळवींची प्रतिक्रिया समोर आली आहे. आमदार राजन साळवी यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत म्हटलं, ४० वर्षे मी शिवसैनिक म्हणून काम करतोय. शिवसैनिक, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख आणि तीन वेळा आमदार झालो. तसेच उपनेता म्हणूनही काम करत आहे. माझी निष्ठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पायाशी... राजकीय घडामोडींमुळे अशा चर्चा रंगत असतील.

राजन साळवी यांनी शिंदे गटात सहभागी होण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला असला तरी राजकारणात कधी आणि कुठल्याक्षणी काय होईल याचा अंदाज वर्तवता येऊ शकत नाही. आता येणारा काळच सांगेल की, राजन साळवी खरोखर शिंदे गटात सहभागी होणार की शिवसेनेतच राहणार.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी