मुंबई : Shiv Sena Crisis : शिवसेनेतील एकनाथ शिंदे बंडानंतर आता शिवसेना (Shiv Sena) अधिक आक्रमक झाली आहे. बंडखोर आमदारांना शय देण्यासाठी उद्धव ठाकरे कामाला लागले आहेत. वेगवेगळ्या बैठका घेत आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न ठाकरे करताना दिसत आहेत. बंडखोर आमदारांना मात देण्यासाठी त्यांना पर्याय शोधण्यात येत आहेत.
शिवसेनेच्या 40 बंडखोर मंत्री आणि आमदारांच्या जागेवर पर्यायी आणि सशक्त उमेदवारांना शोध करा, मतदारसंघात जास्तीत जास्त वेळ द्या असे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे नाशिक जिल्ह्यातील सुहास कांदे आणि दादाजी भुसेंचे वांदे होणार आहेत. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर आमदारांना आपल्यासोबत जोडून ठेवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा बैठकांचा सपाटा सुरुच आहे.
शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे हे बैठका घेत आहेत. त्यांनी पक्ष बांधणीवर जोर दिला आहे. आता तर नाशिक जिल्ह्यात दादा भुसे आणि सुहास कांदे यांना पर्याय शोधा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना दिले आहेत. दरम्यान, पक्ष बांधणीवर उद्धव ठाकरे यांनी जोर दिला असताना बैठकांचा सपाटा सुरुच ठेवला आहे. आज दुपारी राज्यातील महिला आघाडीतल्या प्रमुख महिला नेत्यांची बैठक बोलावली आहे. शिवसेना भवन इथं आज ही बैठक होणार आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.