Ranbir Alia Wedding : रणबीर-आलियाच्या लग्नाच्या गेस्ट लिस्टमधून शिवसेनेचे घोटाळे उघड; आपकडून यादी व्हायरल

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 14, 2022 | 16:43 IST

सध्या बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीला रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या विवाह सोहळ्याचा फिव्हर चढला आहे. अशातच आता अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षाच्या (AAP) इन्स्टाग्राम (Instagram) पोस्टने बॉलिवूडसह राजकीय वर्तुळातील वातावरण अजून तापवलं आहे.

Shiv Sena scam revealed from Ranbir-Alia's wedding guest lis
आपनं लीक केली रणबीर-आलियाच्या लग्नाची गेस्ट लिस्ट  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • लिस्टमध्ये मुंबई महानगरपालिकेतील एकेका घोटाळ्याची माहिती देण्यात आली आहे.
  • महानगरपालिकेचा मिठी नदीच्या सफाई घोटाळा

मुंबई: सध्या बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीला रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या विवाह सोहळ्याचा फिव्हर चढला आहे. अशातच आता अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षाच्या (AAP) इन्स्टाग्राम (Instagram) पोस्टने बॉलिवूडसह राजकीय वर्तुळातील वातावरण अजून तापवलं आहे. आप कडून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नात कोण-कोण पाहुणे येणार याची गेस्ट लिस्ट (Guest list) व्हायरल केली आहे.

परंतु यातून त्यांनी राज्यातील सत्ताधारी पक्ष शिवसेनेवर टीका घोटाळ्याचा आरोप केला आहे. ही पोस्ट इन्स्टाग्रामवर चांगलीच व्हायरल झाली आहे.
रणबीर आणि आलियाच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांची लिस्ट अशा कॅप्शनसह 'आप'च्या इन्स्टा हँडलवरून एक लिंक शेअर करण्यात आली आहे.  दरम्यान ही पोस्ट पाहून रणबीर-आलियाच्या लग्नातील गेस्ट लिस्ट लीक झाल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र या यादीतून 'आप'ने आपला राजकीय हेतू साध्य करत मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला लक्ष्य केले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AAP Mumbai (@aap4mumbai)

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नात कोण-कोण पाहुणे येणार, हे पाहण्याच्या उत्सुकतेने अनेकांनी इ्न्स्टा लिंकवर क्लिक केले. ही लिंक ओपन केल्यानंतर त्याठिकाणी पाहुण्यांची यादी पाहण्यासाठी उजवीकडे स्वाईप करा, असे लिहले आहे. मात्र, उजवीकडे स्वाईप केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो दिसतो. त्या फोटोवर मुंबई महानगरपालिकेकडून मिठी नदीच्या सफाई झालेल्या घोटाळ्याचा आकडा लिहिलेला आहे. या स्लाईड जसजशा पुढे जातात, त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतील एकेका घोटाळ्याची माहिती देण्यात आली आहे. 

रणबीर-आलियाचं लग्न कधी आणि कुठे?

आज रणबीर आणि आलिया हे दोघे वांद्रे येथील 'वास्तू' अपार्टमेंटमध्ये पारंपरिक पद्धतीने विवाहबद्ध होतील. या विवाह सोहळ्याला केवळ ५० लोक उपस्थित राहणार आहेत. यामध्ये रणबीर आणि आलियाच्या नातेवाईकांचा समावेश असल्याचे सांगितले जातं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी