Shivsena Crises । आता शाखाप्रमुखांचाही सेनेला जय महाराष्ट्र, खिंडार पडायला सुरूवात

Shiv Sena shakhapramukh resigns । शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत शिवसेनेत खिंडार पडण्यास सुरवात झाली आहे. नाराज शिवसैनिक, शाखाप्रमुखांना कसे थांबविणार, असा प्रश्न सध्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे.

shiv Sena Shakhapramukh resign from post in mumbai
Shivsena Crises । आता शाखाप्रमुखांचाही सेनेला जय महाराष्ट्र  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • प्रकाश पुजारी आणि कौस्तुभ महामुणकर यांचा शाखाप्रमुख पदाचा राजीनामा
  • शिवसेनेतील ४० आमदारांच्या बंडानंतर राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले. त्यानंतरही शिवसेनेत मोठी पडझड सुरुच आहे.
  • आता शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहेत.

मुंबई : शिवसेनेतील ४० आमदारांच्या बंडानंतर राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले. त्यानंतरही शिवसेनेत मोठी पडझड सुरुच आहे. आता शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहेत. संघटनेत फूट पडू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना शाखाप्रमुखांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. 

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत शिवसेनेत खिंडार पडण्यास सुरवात झाली आहे. नाराज शिवसैनिक, शाखाप्रमुखांना कसे थांबविणार, असा प्रश्न सध्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. अशातच आता शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच हादरे बसू लागले आहेत. मागाठाणे विभागातील दोन शाखाप्रमुखांनी पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला आहे.

शाखा क्रमांक 3 चे शाखाप्रमुख प्रकाश पुजारी आणि शाखा क्रमांक 12 चे शाखाप्रमुख कौस्तुभ महामुणकर यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. महिला शाखा संघटक सुषमा गायकवाड यांनीही पदाचा राजीनामा दिला.आमदारांची बंडखोरी होऊनही आतापर्यंत मुंबईत एकाही शाखाप्रमुखाने उघडपणे राजीनामा दिला नव्हता. या दोन शाखाप्रमुखांनी राजीनामा दिल्याने राजीनामा सत्र सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अधिक वाचा : ​बादशाहचं नवं गाणं रिलीज, काही तासातच इंटरनेटवर तुफान Viral

बहुमत चाचणीस 'दांडी'

शिवसेना विभागप्रमुख विलास पोतनीस यांना पुजारी यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्रात प्रकाश पुजारी यांनी म्हटले आहे की, “गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या राजकीय घडामोडी आणि ठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याशी असलेले माझे घनिष्ठ संबंध पाहता प्रभागातील पदाधिकारी व शिवसैनिक माझ्याकडे नाहक संशयाने पाहत आहेत. परस्परात संभ्रमाचे वातावरण तयार करून माझ्याबाबतीत चुकीचे संदेश पोहचवत आहे. मी याकारणाने माझ्या शाखा प्रमुखपदाचा राजीनामा आपणाकडे सुपूर्द करीत आहे,”

अधिक वाचा : 'आम्ही तर मंत्रिपद सोडलं;, गुलाबराव आले फॉर्मात

मागाठाणे मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. सुर्वे आज (बुधवारी) सायंकाळी आपल्या मतदारसंघात परतत असून सायंकाळी आपल्या समर्थकांची भेट घेणार आहेत.सु्र्वें यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रकाश पुजारी यांनी राजीनामा दिल्याने ठाण्यात अजून पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारी असल्याचे समजते.

अधिक वाचा : तर मातोश्रीवर परत जाऊ बंडखोर आमदार संजय राठोडांच वक्तव्य

शिवसेनेला पुण्यातही मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील नगरसेवक नाना भानगिरे हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे गटाकडून नाना भानगिरे यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिली जाणार आहे. नाना भागिरे हे आतापर्यंत पुणे महापालिकेत तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी तीन वेळा हडपसर मतदारसंघातून विधानसभेची निवडणुक लढवली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी