शरद पवारांमुळे शिवसेनेत फुट? , केसरकरांच्या दाव्यामुळे चर्चेला उधाण

मुंबई
भरत जाधव
Updated Jul 13, 2022 | 14:18 IST

शिवसेनेत वेळोवेळी फुट होत असते असं म्हटलं जातं. परंतु या फुटीमागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कारणीभूत असल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Spokesperson Deepak Kesarkar) यांनी केला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray), नारायण राणे (Narayan Rane) यांच्या सेना सोडण्यामागे शरद पवारांचा हात असल्याचं ते म्हणालेत.

Pawar helps Narayan Rane to quit Shiv Sena
नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यास पवारांची मदत   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई :  शिवसेनेत वेळोवेळी फुट होत असते असं म्हटलं जातं. परंतु या फुटीमागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कारणीभूत असल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Spokesperson Deepak Kesarkar) यांनी केला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray), नारायण राणे (Narayan Rane) यांच्या सेना सोडण्यामागे शरद पवारांचा हात असल्याचं ते म्हणालेत. शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख (Nationalist Congress) शरद पवार (Sharad Pawar) यांचा हात होता, असा आरोप शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी केला आहे. नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली होती. राज ठाकरेंच्या पाठीशीही शरद पवारांचे आशीर्वाद होते,असा दावाही दीपक केसरकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. 

एकनाथ शिंदे आणि 50 आमदारांनी केलेला बंड हा सामन्य जनतेला आवडलेला नाही. त्याचा परिणाम दिसतील, असा दावा शरद पवारांनी केली होता. यावर दीपक केसरकर यांनी उत्तर देत स्ट्राईक चढवला आहे. परंतु केसरकरांच्या या आरोपामुळे राज्यातील राजकारण परत एकदा वादंग होण्याची शक्यता आहे. 

Read Also : एनसीबी म्हणतं रियामुळेच सुशांत बनला नशेडी

केसरकर नेमकं काय म्हणाले 

“मी राष्ट्रवादीत होतो, त्यावेळी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या? याचं उत्तरही त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे,” असं केसरकर म्हणाले आहेत.

Read Also: देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस अन् पूर

“आपण प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार आहोत. मी राष्ट्रवादीत असताना ते विश्वासात घेऊन सांगायचे. शरद पवारांनीच मला, जरी मी नारायण राणेंना बाहेर पडण्यासाठी मदत केली असली तरी कोणत्या पक्षात जावं याची अट ठेवलेली नाही असं सांगितलं होतं. हा निश्चितच त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पण याचा अर्थ नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली होती. भुजबळांना तर ते स्वत: बाहेर घेऊन गेले होते. राज ठाकरेंच्या पाठीशीही त्यांचे आशीर्वाद होते. राज ठाकरे त्यांना मानतात,” असं केसरकरांनी सांगितलं आहे.

Read Also: हे तीन गुण असलेले लोक संकटांपासून राहतात दूर

“मातोश्री कधी सिल्व्हर ओकच्या दारी गेल्याचं मी ऐकलेलं नाही. आपला पक्ष मोठा व्हावा, तो सत्तेत असावा ही शरद पवारांची इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण बाळासाहेबांना हे कधीही मान्य नव्हतं. शिवसैनिक कधीही शरद पवारांच्या दावणीला बांधला जाणार नाही,” असं केसरकरांनी सांगितलं.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी