शिवसेनेचा व्हिप फक्त 55, आमदारांना 56 नव्हे; नेमकं आहे तरी काय हा घोळ, जाणून घ्या

मुंबई
भरत जाधव
Updated Feb 20, 2023 | 14:07 IST

निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयानंतर शिंदे गटाला (Shinde group) शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं. त्यानंतर शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या ( Uddhav Thackeray) ताब्यात असलेल्या शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा  घेतला. आता शिंदे गट शिवसेना चालवणार आहे.

Shiv Sena whip only 55 MLAs not 56; Know what this mess really is
शिवसेनेचे आमदार 56 पण व्हिप लागले 55 आमदारांना, काय आहे घोळ  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • विधीमंडळातील पक्ष कार्यालयावर ताबा घेतल्यानंतर शिंदे गटाचे प्रतोद म्हणजेच आता शिवसेनेचे प्रतोद झालेले भरत गोगावले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
  • शिवसेनच्या 56 आमदारांना हा व्हिप मान्य करणे आवश्यक आहे.
  • अंधेरी पूर्व पोटनिवडणूक अनेक कारणांमुळे खूप चर्चेत राहिली होती.

मुंबई : निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयानंतर शिंदे गटाला (Shinde group) शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं. त्यानंतर शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या ( Uddhav Thackeray) ताब्यात असलेल्या शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा  घेतला. आता शिंदे गट शिवसेना चालवणार आहे. त्यानुसार शिंदे गटातील प्रतोद भरत गोगावले (Bharat gogavale) यांचा व्हिप सर्व शिवसेनेच्या सर्व आमदारांना मान्य करावा लागणार आहे. विधीमंडळातील कार्यालयात येण्यासाठी गोगावले शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप बजावू शकतात. (Shiv Sena whip only 55 MLAs not 56; Know what this mess really is)

अधिक वाचा  :  Daily Horoscope :सहा राशींसाठी सोमवती अमावस्येचा दिवस असेल भारी
दरम्यान, शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह काही आमदार विधीमंडळात दाखल झाले  आणि विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला आहे. याआधी ठाकरे गटाचा या कार्यलयावर ताबा होता. विधीमंडळातील पक्ष कार्यालयावर ताबा घेतल्यानंतर शिंदे गटाचे प्रतोद म्हणजेच आता शिवसेनेचे प्रतोद झालेले भरत गोगावले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अधिक वाचा  :  तुम्हाला परीक्षेत टॉपर व्हाययंच मग लावा या सवयी

त्यावेळी त्यांनी सर्व शिवसेना आमदारांना विधीमंडळात उपस्थित राहण्यास व्हिप बजावण्यात येणार असल्याचं सांगितलं. हा व्हिप शिवसेनच्या 56 आमदारांना मान्य करणे आवश्यक आहे. जर या व्हिपचे उल्लंघन झाले तर आमदारांची आमदारकी जाईल. परंतु या सर्व परिस्थितीत ऋतुजा लटकेंसाठी हा व्हिप लागू नसणार. पक्षाचा व्हिप मान्य केला नाहीतर आमदार निलंबित होत असतात पण लटकेंना हा व्हिप लागू होणार नाही आणि त्यांच्यावर कारवाई का होणार नाही, असा प्रश्न पडला असेल. 

अधिक वाचा  :   उद्धव ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का

हे कोडं समजून घेण्यासाठी आपल्याला अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक आठवावी लागेल. अंधेरी पूर्व पोटनिवडणूक अनेक कारणांमुळे खूप चर्चेत राहिली होती.उद्धव ठाकरे गट पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्ह गोठल्यानंतर उद्धव ठाकरे या पोटनिवडणुकीला सामोरे गेले होते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाकडून अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली होती.

या निवडणुकीत लटके यांचा मोठा विजय झाला होता. त्यांना महाविकास आघाडीकडून पाठिंबा होता. शिवाय त्यांनी मशाल या पक्ष चिन्हावर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नावावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांना प्रतोद भरत गोगावले यांनी व्हिप बजावला तरी तो त्यांना लागू होणार नाही, असं राजकीय पत्रकारांचे मत आहे. 

अधिक वाचा  : लग्नासाठी पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावे?

दरम्यान,  एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेनेत अंतर्गत फूट पडली. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पाहायला मिळाले. दोन्ही गटांकडून अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. तसेच, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

अधिक वाचा  :  चंद्राची पाहून अदा अनेक सर्जेराव फिदा

तिथून पुढे ही लढाई सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आणि तिथून या प्रकरणाला अनेक फाटे फुटले. अशातच शुक्रवारी (17 फेब्रुवारी) केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत मोठा निर्णय दिला. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षातला उद्धन ठाकरेंना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी