Shiv Sena in UP : शिवसेना उत्तर प्रदेशमध्ये १०० जागा लढवणार, संजय राऊतांनी दिले संकेत

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 12, 2022 | 19:36 IST

Shiv Sena will contest on 50-100 seats in Uttar Pradesh : शिवसेना उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या ५० ते १०० जागा लढवणार, असे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले. शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत उद्या (गुरुवार १३ जानेवारी २०२२) उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जात आहेत.

Shiv Sena will contest on 50-100 seats in Uttar Pradesh
शिवसेना उत्तर प्रदेशमध्ये १०० जागा लढवणार, संजय राऊतांनी दिले संकेत  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • शिवसेना उत्तर प्रदेशमध्ये १०० जागा लढवणार, संजय राऊतांनी दिले संकेत
  • संजय राऊत उद्या (गुरुवार १३ जानेवारी २०२२) उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर
  • शिवसेनेच्या राजकारणाचा आधारस्तंभ महाराष्ट्रात

Shiv Sena will contest on 50-100 seats in Uttar Pradesh : मुंबई : शिवसेना उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या ५० ते १०० जागा लढवणार, असे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले. शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत उद्या (गुरुवार १३ जानेवारी २०२२) उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते निवडणुकीसाठी उत्तर प्रदेश शिवसेनेने केलेल्या तयारीचा आढावा घेतील. तसेच उत्तर प्रदेशमधील शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील.

शिवसेनेच्या राजकारणाचा आधारस्तंभ महाराष्ट्रात आहे. यामुळे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून प्रचाराला कोण जाणार आणि प्रचाराचा कार्यक्रम या संदर्भात संजय राऊत यांच्या दौऱ्यादरम्यान चर्चा आणि नियोजन होणार असल्याचे वृत्त आहे. याआधीही शिवसेनेने उत्तर प्रदेशच्या निवडणुका लढवल्या आहेत. मात्र या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या पदरी विजयाच्या स्वरुपात मोठे यश आलेले नाही. राष्ट्रीय राजकारणासाठी शिवसेना उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे.

याआधी पश्चिम बंगालमध्ये शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार होती. पण आयत्यावेळी मतविभाजन टाळण्यासाठी माघार घेत असल्याचे जाहीर करत शिवसेनेने पश्चिम बंगालमध्ये २०२१ची विधानसभा निवडणूक लढवणे टाळले होते. उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. समाजवादी पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेससाठी एक जागा सोडली आहे. अनुपशहरमधून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस के. के. शर्मा निवडणूक लढवणार आहेत. 

उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात, मणीपूरमध्ये दोन टप्प्यात तर पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात एका टप्प्यात निवडणूक; मतमोजणी १० मार्चला होणार

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचे सात टप्पे

पहिला टप्पा - १० फेब्रुवारी २०२२
दुसरा टप्पा - १४ फेब्रुवारी २०२२
तिसरा टप्पा - २० फेब्रुवारी २०२२
चौथा टप्पा - २३ फेब्रुवारी २०२२
पाचवा टप्पा - २७ फेब्रुवारी २०२२
सहावा टप्पा - ३ मार्च २०२२
सातवा टप्पा - ७ मार्च २०२२
मतमोजणी - १० मार्च २०२२

पंजाब, उत्तराखंड आणि गोव्याच्या निवडणुकीचा एकमेव टप्पा

मतदान - १४ फेब्रुवारी २०२२
मतमोजणी - १० मार्च २०२२

मणीपूरच्या निवडणुकीचे दोन टप्पे

मतदान पहिला टप्पा - २७ फेब्रुवारी २०२२
मतदान दुसरा टप्पा - ३ मार्च २०२२
मतमोजणी - १० मार्च २०२२

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी