शिवसेना मविआतून बाहेर पडणार,  राऊतांनी दिली बंडखोर आमदारांना मोठी ऑफर 

 आम्ही मविआमधून बाहेर पडायला तयार आहोत,  २४ तासांच्या आत मुंबईत येऊन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर सांगावे अशी मोठी ऑफर खासदार संजय राऊत यांनी  बंडखोर आमदारांना दिली आहे. 

Breaking News
शिवसेना मविआतून बाहेर पडणार,  राऊतांनी दिली बंडखोर आमदारांना मोठी ऑफर  
थोडं पण कामाचं
  • आम्ही मविआमधून बाहेर पडायला तयार आहोत,
  •  २४ तासांच्या आत मुंबईत येऊन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर सांगावे अशी मोठी ऑफर खासदार संजय राऊत यांनी  बंडखोर आमदारांना दिली आहे.
  • या प्रकरणाला एक वेगळचे वळण लागले आहे. हा सर्व अट्टाहास फक्त मविआतून बाहेर पडण्यासाठी करण्यात आला होता का असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. 

मुंबई :  आम्ही मविआमधून बाहेर पडायला तयार आहोत,  २४ तासांच्या आत मुंबईत येऊन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर सांगावे अशी मोठी ऑफर खासदार संजय राऊत यांनी  बंडखोर आमदारांना दिली आहे.  त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळचे वळण लागले आहे. हा सर्व अट्टाहास फक्त मविआतून बाहेर पडण्यासाठी करण्यात आला होता का असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. 

मुख्यमंत्री निवासस्थान वर्षावर आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सुरूवातील संजय राऊत यांनी शिंदे यांच्या गटातून सुटका करून आलेल्या कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांच्यावर बेतलेल्या प्रसंग प्रसार माध्यमांसमोर सांगायला लावले. त्यानंतर संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना सांगितले की, आमदारांनी गुवाहाटीहून संवाद साधू नये, त्यांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी. सर्व आमदारांची इच्छा असेल तर आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा विचार करण्यास तयार आहोत, परंतु त्यासाठी त्यांना येथे यावे लागेल, असे राऊत म्हणाले. 

२१ आमदार संपर्कात - राऊत 

गुवाहाटी येथे असलेले २१ आमदार यांना धमकी देऊ तिथे ठेवण्यात आले आहेत. ते मुंबईत परत आल्यावर पुन्हा शिवसेनेत सामील होतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. आहे. 

राष्ट्रवादी आणि काँग्रेसला संशय 

महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी शिवसेनेने हे नाटक केले असल्याचा संशय राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काही आमदारांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेचे आमदार गेले की पाठवले असा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे आता राऊत यांनी दिलेली ऑफर त्याचाच एक भाग आहे का असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

हळूहळू जात आहेत आमदार 

एकनाथ शिंदेसोबत थेट सर्व आमदार गेले नाही. छोट्या गटाच्या माध्यमातून आमदार गुवाहाटी येथे जात आहेत. त्यामुळे संशय बळावतो आहे, अशी चर्चा सुरू आहे. एकत्र ३७ आमदार गेले असते तर शिंदेंना निर्णय घ्यावा लागला असता, पण आता हळूहळू आमदार गेल्याने या नाट्यास वेळ मिळतो आहे. 

दोन तृतांश आमदार होऊ दिले नाही 

शेवटपर्यंत शिंदे यांच्यासोबत ३७ शिवसेना आमदार होऊ देणार नाही. आतापर्यंत ३५ शिवसेना आमदारांचा पाठिंबा असल्याचे चित्र आहेत. त्यात दादा भुसे दाखल झाले तर ही संख्या ३६ होईल. अजून एक आमदार आल्यास शिंदेच्या गट पूर्ण होईल.

इथे जो पक्ष आहे तोच शिवसेना हा पक्ष आहे. -  उल्हास बापट ,कायदे तज्ञ

 हे जे चालू आहे महाराष्ट्रामध्ये याला आम्ही इंग्रजी मध्ये WAR OF ATTRITION म्हणतो. काही लोक बाहेर गेलेत. त्यातले किती लोक खरे गेले आहेत. किती लोकांना पाठवले गेलं आहे. हे कोणाला माहित नाही. याचा अंतिम निर्णय अजून लागलेला नाही आहे. ३७ लोक जर फुटलेल्या गटाबरोबर गेले असतील तर ते अपात्र होणार नाहीत. पण ३६ गेले असतील तर ३६ च्या ३६ अपात्र होतील. इथे जो पक्ष आहे तोच खरा शिवसेना पक्ष आहे. जो आसाम मध्ये जे गेले आहेत तिथून त्यांना नविन पक्ष आमचा आहे असा दावा करता येत नाही. त्या साठी त्यांना इलेक्शन कमिशन कडे जावं लागेल. राजकीय पक्षाला कोणते चिन्ह द्यायचे हा त्यांचा निर्णय असतो. त्यामुळे त्यांना हे सिध्द करावे लागेल. जर ते हे सिध्द करु शकले तर त्यांना हे चिन्ह मिळेल. एकनाथ शिंदे धनुष्यबाण चिन्हासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.

नेमके काय म्हणाले राऊत 

 
Live - वर्षावर शिवसेना आमदार खासदारांची बैठक Live - वर्षा शासकीय निवासस्थानी शिवसेना आमदार आणि खासदारांची बैठक - मुंबई ते सुरत ते गुवाहाटी पर्यंतचा एकनाथ शिंदे यांच्यासोबत आ. नितीन देशमुख आणि आ. कैलास पाटील यांचा नकळत झालेल्या प्रवासाचा खुलासा Posted by RNO - Right News Online on Thursday, June 23, 2022

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी