....त्यांची ५२ असो वा १५२, कितीही 'कुळं' उतरली तरी शिवसेना संपणार नाही; उद्धव ठाकरेंचे भाजपला फटकारे

Uddhav Thackeray : मार्मिक मासिकाला ६२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शनिवारी डिजिटल माध्यमातून कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी शिंदे सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

Shiv Sena will not end though; Uddhav Thackeray's challenge to BJP
....त्यांची 'बावन' असतील ना एकशे बावन्न, कितीही 'कुळं' उतरली तरी शिवसेना संपणार नाही; उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान ।   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मार्मिक मासिकाला ६२ वर्षे पूर्ण
  • उद्धव ठाकरे यांचा मोदी सरकारवर हल्ला
  • पुन्हा एकदा शिवसेनेचे सरकार स्थापन होणार...'

मुंबई : मार्मिक या मासिकाच्या ६२ व्या वर्धापन दिन सोहळ्यात फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या शिवसेना संपत चाललेला पक्ष या वक्तव्याचा धागा पकडून  त्यांच्या बावन असो किंवा एकशे बावन्न असो, तुमची कितीही कुळं खाली उतरली तरी शिवसेना संपणार नाही, असा म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांना जोरदार टोला लगावला आहे. (Shiv Sena will not end though; Uddhav Thackeray's challenge to BJP)

अधिक वाचा : कैदी नंबर 8959 : आर्थर रोड कारागृहात Sanjay raut ची नवी ओळख, जाणून घ्या ते सध्या काय करतायत?

उद्धव पुढे म्हणाले की, हे लोक लोकशाहीसाठी घातक असल्याचे ते म्हणाले. ते छोटे पक्ष संपवण्याविषयी बोलतात. ते (भाजप) देशाची संघीय रचना उद्ध्वस्त करत आहेत आणि घराघरात तिरंग्याचा नारा देत आहेत. हर घर येथील तिरंगा मोहिमेबाबत बोलताना ते म्हणाले की, याबाबत दोन व्यंगचित्रे समोर आली आहेत. एक म्हणजे ज्यांना घर नाही त्यांनी तिरंगा कुठे लावायचा? त्याचवेळी जन्माष्टमीच्या सणाला अनुसरून दुसरे व्यंगचित्र तयार करण्यात आले आहे. यामध्ये एक भक्त भगवान कृष्णाला सांगतो की, तुम्ही लोणी नंतर खा, आधी ५ टक्के जीएसटी द्या. केवळ तिरंगा फडकवणे हा देशभक्तीचा पुरावा नाही, असे उद्धव ठाकरे यांनी खडे बोल सुनावले.

अधिक वाचा : Coronavirus Updates: कोरोना संसर्गाचा वाढला वेग !, 4.36% पॉझिटिव्हिटी रेट

उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला. "महाराष्ट्रात सरकार आहे कुठं? मंत्र्यांना खातं नाही. त्यांचाच आझादीचा अमृत महोत्सव सुरू आहे. राज्यात अतिवृष्टीची गंभीर समस्या असताना मंत्र्यांकडून सत्कार स्वीकारले जात आहेत. जनतेला दिलासा देण्याचं काम कुठं सुरू आहे? या मुद्द्यांवर व्यंगचित्रकारांनी आपल्या ब्रशचे फटकारे मारले पाहिजेत", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी