पालकमंत्र्यांची पंचाईत, मैदानाला 'टिपू सुलतान'चे नाव देण्याला शिवसैनिकांचा विरोध

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 27, 2022 | 05:51 IST

Shiv Sena workers protests against naming Mumbai sports complex after Tipu Sultan : मुंबई महापालिकेच्या हद्दीतील एका मैदानाला पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते 'टिपू सुलतान' हे नाव देणार असल्याचे पोस्टर ठिकठिकाणी झळकले. मैदानाच्या प्रवेशद्वारावर 'टिपू सुलतान' या नावाची पाटी झळकली. नंतर शिवसैनिकांनी निषेध करण्यासाठी प्रवेशद्वाराबाहेर घोषणाबाजी सुरू केली. यामुळे पालकमंत्री अस्लम शेख यांचीच पंचाईत झाल्याचे चित्र आहे.

Shiv Sena workers protests against naming Mumbai sports complex after Tipu Sultan
पालकमंत्र्यांची पंचाईत, मैदानाला 'टिपू सुलतान'चे नाव देण्याला शिवसैनिकांचा विरोध 
थोडं पण कामाचं
  • पालकमंत्र्यांची पंचाईत, मैदानाला 'टिपू सुलतान'चे नाव देण्याला शिवसैनिकांचा विरोध
  • स्थानिक शिवसैनिकांचा मैदानाला 'टिपू सुलतान'चे नाव देण्याला विरोध
  • भाजप आणि विहिंपचा तसेच अनेक हिंदुत्ववादी संघटनांचा मैदानाला 'टिपू सुलतान'चे नाव देण्याला विरोध

Shiv Sena workers protests against naming Mumbai sports complex after Tipu Sultan : मुंबई : मुंबई महापालिकेच्या हद्दीतील एका मैदानाला पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते 'टिपू सुलतान' हे नाव देणार असल्याचे पोस्टर ठिकठिकाणी झळकले. मैदानाच्या प्रवेशद्वारावर 'टिपू सुलतान' या नावाची पाटी झळकली. नंतर शिवसैनिकांनी निषेध करण्यासाठी प्रवेशद्वाराबाहेर घोषणाबाजी सुरू केली. यामुळे पालकमंत्री अस्लम शेख यांचीच पंचाईत झाल्याचे चित्र आहे.

अस्लम शेख मुंबई शहर जिल्ह्याचे तर आदित्य ठाकरे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पण अस्लम शेख यांचा विधानसभा मतदारसंघ मालाड पश्चिम हा आहे. हा मतदारसंघ मुंबईच्या उपनगर जिल्ह्यात आहे. यामुळे मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही अस्लम शेख यांचे मालाडमध्ये अधूनमधून सरकारी कार्यक्रम असतात. यावेळी निमित्त मैदानाच्या नामकरणाचे होते. पण हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद तसेच अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी मैदानाला 'टिपू सुलतान'चे नाव देण्याला विरोध केला आहे. यात स्थानिक शिवसैनिकांचाही समावेश झाला आहे. हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या 'टिपू सुलतान'चे नाव मैदानाला देऊ नये अशी विरोध करणाऱ्यांची ठाम भूमिका आहे.

काँग्रेस नेते आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये (मविआ) मंत्री असलेले अस्लम शेख मैदानाचे नामकरण 'टिपू सुलतान' करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. पण मविआमध्ये मुख्यमंत्रीपद ज्या शिवसेनेकडे आहे त्यांचे स्थानिक कार्यकर्ते मैदानाचे नामकरण 'टिपू सुलतान' करण्याला विरोध करत आहेत. यामुळे विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबईत मुद्दाम मैदानाला 'टिपू सुलतान' हे नाव देऊन सत्ताधाऱ्यांचाच शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे; असा आरोप विश्व हिंदू परिषदेच्या प्रवक्त्याने केला. याआधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे निमित्त साधून बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाने हिंदुत्व सोडले नसल्याचे सांगितले होते. हे वक्तव्य करून ७२ तास होण्याआधीच मैदानाला 'टिपू सुलतान' हे नाव देण्यावरून मुंबईत राजकारण तापले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी