शिवप्रेमींसाठी महाविकास आघाडीने घेतला सर्वात मोठा निर्णय 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासावर आधारित 'शिवसृष्टी' थीम पार्क उभारण्यात येईल, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

shivaji maharaj shiv shushtri mahavikas aghadi ajit pawar political news in marathi
शिवप्रेमींसाठी महाविकास आघाडीने घेतला सर्वात मोठा निर्णय   |  फोटो सौजन्य: BCCL

 मुंबई :  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासावर आधारित 'शिवसृष्टी' थीम पार्क उभारण्यात येईल, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. सदर कामाचा आराखडा उभारण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्याचंही त्यांनी सांगितलं.

याखेरीज महाराजांच्या काळापासून ते सद्यस्थितीतला आधुनिक महाराष्ट्र कशा पध्द्तीनं घडला, याविषयीची माहिती देणारं म्युझिअम उभारलं जाईल, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली आहे. ट्विव करुन यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

 

 

परदेशात उभारल्या जाणाऱ्या टाऊन हॉलच्या धर्तीवर बारामतीतल्या तीन हत्ती चौकाचा विकास करण्याचे निर्देश दिले. याची जबाबदारी प्रसिद्ध वास्तुविशारद पी.के. दास यांच्याकडे सोपवण्यात आली. यासंदर्भातला संपूर्ण आराखडा तयार करण्यास सांगितले. यासह कॅनल सुशोभीकरणाच्या सूचना केल्या, असं अजित पवार म्हणाले आहेत.

नदीच्या पात्रात कचऱ्यापायी पाण्याचा फुगवटा निर्माण होऊ नये यासाठी मोठे कॅनल आणि पावसाळ्यात पुराचा धोका टाळण्यासाठी कऱ्हा नदीचं पात्र स्वच्छ करण्याचे निर्देश दिले. यासोबतच पांडवकालीन काशी विश्वेश्वर मंदिराच्या डागडुजीकरणासाठीची PWD ला सूचना व त्यांना निधी उपलब्ध करून दिला, असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

दरम्यान, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यापासून अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. यापूर्वी त्यांनी इंदू मिल येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या साइटलाही भेट दिली होती. तसेच तेथील पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. आता शिवसृष्टी थीम पार्कची घोषणा करून शिव प्रेमींना आणि महाराष्ट्रातील नागरिकांना मोठी भेट दिली आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी