Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी पालिकेकडून शिवसेनेच्या दोन्ही गटांना परवानगी नाही, शिवसेनेच्या ठाकरे गटाची उच्च न्यायालयात धाव

Dasara Melava : दसरा मेळाव्यावरून शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट समोरा समोर आले आहेत. दसरा मेळाव्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटाला शिवाजी पार्कवरील परवानगी नाकारण्यात आली आहे. याविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

uddhav vs shinde
ठाकरे वि. शिंदे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दसरा मेळाव्यावरून शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट समोरा समोर आले आहेत.
  • दसरा मेळाव्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटाला शिवाजी पार्कवरील परवानगी नाकारण्यात आली आहे.
  • याविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

Dasara Melava : मुंबई : दसरा मेळाव्यावरून शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गत समोरा समोर आले आहेत. दसरा मेळाव्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटाला शिवाजी पार्कवरील परवानगी नाकारण्यात आली आहे. याविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. (shivaji park dasara melava shivsena Thackeray group appeal in high court for permission)

अधिक वाचा :  Mumbai: 20 वर्षीय तरुणीवर आजोबा आणि काकांनी केला बलात्कार, 12 वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार

१९६६ साली शिवसेनेची स्थापना झाली होती, तेव्हापासून शिवसेनेचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर होत आहे. शिवसेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनांतरही ही परंपरा सुरू होती. आता शिवसेनेतून एकनाथ शिंदे ४० आमदारांसोबत बाहेर पडले असून शिंदे गटाने आपलीच शिवसेना खरी असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाहीतर शिंदे गटाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाणवरही दावा केला आहे. आता शिंदे गटाने आपलीच शिवसेना खरी असून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आपल्याकडे असल्याचे म्हटले आहे. शिवाजी पार्कची परवानगी मिळेल नाही याची संदिग्धता असताना शिंदे गटाने बीकेसीच्या मैदानाची परवानगी मागितली होती. शिंदे गटाला यासाठी परवानगीही मिळाली आहे. परंतु शिंदे गट अजूनही शिवाजी पार्कसाठी आग्रही आहे. शिवाजी पार्कसाठी मुंबई महानगरपालिकेने शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे.या प्रकरणी ठाकरे गटाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.  

अधिक वाचा :  Naxilite Surrender : गडचिरोली पोलिसांना मोठे यश, सहा लाख इनाम असणार्‍या दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण 

मुंबई उच्च न्यायलात या प्रकरणी ९०६ क्रमांकावर सुनावणी आहे. पहिल्या तासाभरात यावर सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे. दरवर्षी शिवसेना पक्षाकडून मुंबई महानगर पालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली जाते. परंतु या वेळी राजकीय दबावापोटी परवानगी नाकारण्यात आली आहे असा आरोप शिवसेनेने केला आहे. १९६६ पासून शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे, त्यामुळे शिवसेनेला ही परवानगी मिळावी अशी मागणी सुभाष देसाई यांनी केली आहे. २०१६ साली राज्य सरकारने एक परिपत्रक काढले होते, त्यानुसार शिवाजी पार्क हे मैदान घोषित करण्यात आले असले तरी या मैदानावर काही पारंपरिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली होती. शिवाजी पार्कवर बंगाली समाजाची देवी बसते, याची तयारीही शिवाजी पार्कवर सुरू आहे. अशा वेळी शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळणे ही औपचारिकता असते. पाडव्याचा मुहुर्त हा मनसेसाठी राखीव आहे तसाच दसरा मेळावा हा शिवसेनेसाठी राखीव आहे अशी बाजू शिवसेने मांडली आहे. 

अधिक वाचा : Sharad Pawar : पत्राचाळ घोटाळा : खुशाल चौकशी करा, परंतु चौकशी काही आढळले नाही तर... शरद पवार यांचे भाजपला आव्हान

अजित पवारांचा सल्ला 

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेला कोर्टात दाद मागण्याचा सल्ला दिला होता. कोविड काळात अनेक कार्यक्रमांवर बंदी होती, तेव्हा अनेक संघटनांनी कोर्टात धाव घेत सार्वजनिक कार्यक्रमांसाठी परवानगी मिळवली होती असे अजित पवार म्हणाले होते. आता शिवसेनेने कोर्टात जाऊन शिवाजी पार्कसाठी परवानगी मिळवावी असा सल्ला दिला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी