Vinayak Mete Accident : विनायक मेटे यांच्या गाडीचा झाला चक्काचूर, पहा फोटो  

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. पहाटे साडे पाचच्या सुमारास अनोळख्या गाडीने मेटे यांच्या गाडीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यात गाडीचा चक्काचूर झाला.

vinayak mete accident
विनायक मेटे अपघात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू झाला आहे.
  • पहाटे साडे पाचच्या सुमारास अनोळख्या गाडीने मेटे यांच्या गाडीला धडक दिली.
  • ही धडक इतकी भीषण होती की त्यात गाडीचा चक्काचूर झाला.

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू झाला आहे.

पहाटे साडे पाचच्या सुमारास अनोळख्या गाडीने मेटे यांच्या गाडीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यात गाडीचा चक्काचूर झाला.

मुंबई पुणे महामार्गावरील पनवेल खालापूरदम्यान माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला. अपघातात मेटे, त्यांचे सुरक्षारक्षक आणि चालक गंभीर जखमी झाले.

या अपघातानंतर तब्बल एक तास कुठलीच मदत मिळाली नाही अशी माहिती मेटे यांच्या चालकाने दिली.

त्यानंतर मेटे आणि त्यांच्या सहकार्‍यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रुग्णालयात उपचारादरम्यान मेटे यांचे निधन झाले.

विनायक मेटे यांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
 

मेटे यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी