Vidhanparishad : मुंबई : शिवसेनेने राज्यसभा निवडणुकीत कोल्हापूर येथील संजय पवार या एका सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी दिली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेन एका सर्वसामान्य शिवसैनिकाला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात सध्या राज्यसभेसह विधानपरिषद निवडणुकांची धामधूम सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित झाल्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकांसाठीही उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू असून, यामध्ये शिवसेनेच्या दोन उमेदवारांची नावे समोर आली आहेत. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेकडून पुणे संपर्कप्रमुख सचिन अहिर आणि नंदुरबारमधील पक्षाचे नेते आमशा पाडवी यांना संधी देईल, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
अधिक वाचा : नवविवाहित तरुणाने व्हायग्राचा घेतला ओवरडोस, बायको गेली सोडू
राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेसाठी शिवसेनेनं अनेक दिग्गज नेत्यांना धक्का देत एका सर्वसामान्य शिवसैनिक कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावाची घोषणा केली होती. शिवसेनेने दिलेल्या या संधीनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. अशातच विधानपरिषदेच्या निवडणुकीत देखील शिवसेनेने तोच हातकंडा वापरत शिवसेनेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची नावे चर्चेत असताना नंदुरबारमधील आमशा पाडवी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
अधिक वाचा : कुपवाड्यात लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा
२० जून रोजी महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या १० जागांसाठी मतदान होणार आहे. या १० जागांपैकी शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी दोन आणि काँग्रेसकडे एका जागेवर निवडून येण्यासाठी लागणारी मते आहेत. तर, भाजपकडे चार जागांवर निवडून येण्यासाठी आवश्यक असणारी मते आहेत, विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी एका उमेदवाराला २७ मतांची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीतून शिवसेना आणि राष्ट्रवादीचेही प्रत्येकी दोन आमदार विधान परिषदेत जातील. तर काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येईल. त्यानंतरही ज्यांच्याकडे पहिल्या पसंतीची मतं शिल्लक राहतील त्यांना दुसऱ्या उमेदवारासाठी १२ मतांची तजवीज करावी लागणार आहे. दरम्यान, भाजप आणि मित्रपक्ष यांचं संख्याबळ ११३ इतकं होत असल्यामुळे भाजपच्या चार जागा सहज निवडून येऊ शकतात.
अधिक वाचा : तहान लागली अन् लंपास झालं तब्बल ३० लाखांचं सोनं, व्हिडीओ
उमेदवारीसाठी नाव चर्चेत आल्यानंतर काय म्हणाले आमशा पाडवी म्हणाल्या की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला संधी देण्याचा निर्णय घेतला असून याबाबत मला पक्षाचे नेते संजय राऊत यांच्याकडून माहिती देण्यात आली आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेने पक्षाचं काम करत आहे. अशी प्रतिक्रिया आमशा पाडवी यांनी दिली आहे.
सचिन अहिर २०१९ च्या विधानाभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झाले. इतकेच नाहीतर त्यांनी आपला मतदारसंघ आदित्य ठाकरेंना देऊन त्यांच्यासाठी प्रचारही केला. या त्यागाची त्यांना भरपाई अहिर यांना मिळाली असून त्यांची वर्णी विधानपरिषदेवर लागणार आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.