Uddhav Thackeray : भाजपवाल्यांना राजकारणाचे गजकर्ण झाले आहे, उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

Uddhav Thackeray भाजपवल्यांना राजकारणाचे गजकर्ण झाले आहे, राजकारण म्हणून ते काहीही खाजवतात अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच आम्ही भाजपला सोडले, हिंदुत्व नाही, भाजप म्हणजे हिंदुत्व नाही असेही ठाकरे म्हणाले.  बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

थोडं पण कामाचं
  • भाजपवल्यांना राजकारणाचे गजकर्ण झाले आहे.
  • राजकारण म्हणून ते काहीही खाजवतात
  • आम्ही भाजपला सोडले, हिंदुत्व नाही, भाजप म्हणजे हिंदुत्व नाही

Uddhav Thackeray : मुंबई :  भाजपवल्यांना राजकारणाचे गजकर्ण झाले आहे, राजकारण म्हणून ते काहीही खाजवतात अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच आम्ही भाजपला सोडले, हिंदुत्व नाही, भाजप म्हणजे हिंदुत्व नाही असेही ठाकरे म्हणाले.  बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, जे विरोधक माझ्या तब्येतीची काळजी करत आहे. ते काळजीवाहू विरोधक आहेत. ज्या प्रमाणे काळजीवाहू सरकार असतं तसे हे काळजीवाहू विरोधक आहेत. हे विरोधक स्वतःचा स्वतःच्या काळजीने संपणार आहेत असे ठाकरे म्हणाले. तसेच हे काळजीवाहू विरोधक एकेकाळी आपले साथीदार होते, आपण त्यांना पोसलं, २५ वर्षे आपली युतीत सडली असे मी एका सभेत म्हटले होते, या भूमिकेवर मी आजही ठाम असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. 


तसेच पूर्वी बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की राजकारण हे गजकर्ण झाले आहे, या विरोधक राजकारण म्हणून काहीही खाजवत आहेत. हिंदुत्वासाठी आपल्याला तेव्हा सत्ता हवी होती अशी भूमिका बाळासाहेबांनी घेतली होती. भाजपचे हे आजचे हिंदुत्व हे सत्तेसाठी पोकळ हिंदुत्व आहे. त्यांनी हिंदुत्वाचे कातडे पांघरले आहे. २५ वर्ष यांना पोसल्यानंतर आपल्याला कळाले हे दुर्दैव आहे. आमच्यावर हिंदुत्व सोडल्याची टीका होते, आम्ही हिंदुत्व सोडले नाही, आम्ही कदापिही हिंदुत्वापासून दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडले, हिंदुत्व नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. अमित शहा यांनी आव्हान दिले आहे की एकट्याने लढा, हे आव्हान आम्ही स्विकारले आहे. सत्ताधारी म्हणून आमचे अधिकार वापरणार नाही, तुम्ही तुमचे अधिकार वापरणार नाही. लढायचे असेल तर लोकशाही मार्गाने लढा, नाहीतर इडीसारख्या यंत्रणा मागे लावायाच्या आणि राजकारण करायचे हे शौर्य नाही असेही ठाकरे यांनी यावेळी नमूद केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी