Uddhav Thackeray Interview : मुंबई : सध्या देशात विरोधीपक्षांना (opposition party) संपवण्याचे काम सुरू आहे अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP) केली आहे. तसेच या दडपशाहीला विरोध करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र (opposition party unite) आले पाहिजे असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच माझ्याकडे विरोधी पक्षाचे नेतृत्व आहे पण तेवढे पुरसे नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले. (shivsena chief Uddhav Thackeray appeal to opposition unity against bjp)
सामनाला दिलेल्या मुलाखातीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या सत्ताधार्यांना विरोधीपक्षांची भिती वाटते तो त्यांचा कमकुवतपण आहे. कुठलाही राजकीय पक्ष असो मग त्यात शिवसेना असो, भाजप असो, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी. सतत त्यांना जय किंवा पराजय मिळालेले नाही. राजकारणात जय परायज होत असतात. काही नवी पक्ष उदयाला येतात आणि ते ही चमकून जातात. जेव्हा सत्ताधार्यांना सर्वकाही बुडाखाली ठेवावेसे वाटते, जेव्हा सत्ताधार्यंना अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा वाटते तेव्हा सत्ताधार्यांना भिती वाटायला लागते. माननीय अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते की सत्ता येत असते सत्ता जात असते हा देश राहिला पाहिजे. त्याप्रमाणे जर सर्व राजकीय पक्षांनी देशाचा विचार नाही केला तर आपणच आपल्या देशाचे शत्रू आहोत असे उद्धव ठाकरे म्हणाले.
विरोधी पक्षाच्या नेतृत्वावर उद्धव ठाकरे म्हणाले की, हो माझ्याकडे विरोधी पक्षांचे नेतृत्व आहे, परंतु प्रश्न माझ्या एकट्याचा नाही. यासाठी देशातील सर्व राज्यांनी एकत्र आले पाहिजे. भाजपनेही इतर पक्षांनी शत्रुत्व न घेता हेल्दी पॉलिटिक्स करावे. शिवसेना तर त्यांची २५ ते ३० वर्षे सोबती होतो. काही कारण नसताना २०१४ ला त्यांनी युती तोडली होती. भाजपने शिवसेनेसोबत शेवटच्या क्षणाला युती तोडली होती. आताही फक्त भाजपकडे फक्त अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती. कारण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मी वचन दिले होते की शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन. बाळासाहेबांना दिलेले वचन अद्याप अपूर्ण आहे. कारण मी मुख्यमंत्री होईन असे वचन दिले नव्हते. भाजपने ठरवलेल्या गोष्टींना नकार दिला म्हणून मला महाविकास आघाडीची स्थापना करावी लागली आणि मुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Aaditya Thackeray: 'मातोश्रीचे दरवाजे कधीच कोणासाठी बंद नाही' ठाकरेंची शिंदे गटासोबत चर्चेची तयारी
उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे. विरोधी पक्षातील लोकांना घेऊन आम्ही पुण्यवान करतो. ज्यांच्यावर आरोप झाले ते भाजपमध्ये गेले, त्यांचे पुढे काय होणार आहे ? आणि पुन्हा नवनवीन लोकांना त्रास द्यायचा हे चांगल्या राजकारणांचे लक्षण नाही. संजय राऊत तुम्हालाही अटक करण्याची धमकी दिली होती, तुम्हीही भाजपमध्ये सामील झालात तर तुम्हीही पुण्यवान व्हाल. जो कर्माने मरणार असेल त्याला धर्माने मारू नये असे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे अशे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
Narayan Rane: 'उद्धव ठाकरेंसारखा खोटारडा, कपटी माणूस', नारायण राणेंची जहरी टीका
विरोधी पक्षांनी आधी इच्छा दाखवली पाहिजे असे उद्धव ठाकारे म्हणाले. आणीबाणीविरोधात तेव्हा जनता पक्षाची स्थापना झाली होती. जनता पक्षाकडे प्रत्येक पोलिंग बुथवर एक एजंटही नव्हता, तरी जनतेने त्यांना भरभरून मतं दिली होती. तेव्हा स्तरातील लोक बाहेर पडले होते आणि जनता पक्ष सत्तेत आला. परंतु जनता पक्षाचे नेते आपसांत भांडले आणि स्वतःचे सरकार स्वतःच पाडून घेतले. त्यामुळे भाजपसोबत सक्षमपणे लढण्यासाठी इच्छाशक्ती हवी. त्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येताना ठरवले पाहिजे की कोणीही पदांवरून भांडणार नाही. भाजपची पडणारी पावलं ही हुकुमशाहीकडे नेणारी आहेत असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.