BMC Election 2022 : उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूतीची लाट, भाजपच्या गोटात भितीचे वातावरण

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केले आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. असे असले तरी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूतीची लाट निर्माण होईल आणि त्याचा आपल्याला फटका बसेल अशी भिती भाजपच्या गोटामध्ये आहे.

uddhav thackeray
उद्धव ठाकरे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केले आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.
  • त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
  • गामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूतीची लाट निर्माण होईल आणि त्याचा आपल्याला फटका बसेल अशी भिती भाजपच्या गोटामध्ये आहे.

BMC Election 2022 : मुंबई  :शिवसेना नेते (Shivsena Leader) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बंड केले आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. असे असले तरी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत (BMC Election 2022) उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूतीची लाट निर्माण होईल आणि त्याचा आपल्याला फटका बसेल अशी भिती भाजपच्या गोटामध्ये आहे. या सहानुभूतीच्या लाटेमुळे शिवसेनेला फायदा होईल आणि भाजपला फटका बसेल असा अंदाज भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे. (shivsena chief uddhav thackeray may get sympathy in upcoming bmc election bjp trying to damage control)

अधिक वाचा : "राष्ट्रवादीतला एक मोठा नेता लवकरच अनिल देशमुख, नवाब मलिकांना भेटणार", Mohit Kamboj यांचं खळबळजनक ट्विट

हिंदुस्थान टाईम्सने याबद्दल वृत्त दिले आहे. भाजपने एक सर्वे केला आहे आणि त्यात जनमानसांत उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूतीची लाट निर्माण होईल आणि भाजपला त्याचा फटका बसेल असा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय मतदार भावनिक असतो, तो कमजोर किंवा कमी ताकद असलेल्या उमेदवाराच्या झोळीत आपली मतं टाकतो, त्यामुळे आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना याचा फायदा होऊ शकतो असा भाजपचा अंदाज आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका भाजप नेत्याने सांगितले की एखादा मोठा मासा छोट्या माशाला खातो, तेव्हा छोट्या माशाबद्दल सहानुभूती निर्माण होते. त्याच प्रमाणे भाजपसारख्या बलाढ्य राष्ट्रीय पक्षाने शिवसेनेचे नुकसान केले अशी प्रतिमा जनमानसांत निर्माण होईल आणि त्याचे रुपांतर मतदानात होईल अशी भिती पक्षाला आहे. 

अधिक वाचा : Sleeping Hours : हे नेते झोपत का नाहीत? कमी झोपण्यामुळे निर्णयक्षमतेवर परिणाम होतो

भाजपला या सहानूभूतीच्या लाटेचा फटका बसू नये म्हणून पक्षाने जनमासांची लोकप्रियता मिळवण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. त्यात औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामकरण धाराशिव करणे, नवी मुंबई विमानतळाला स्थानिक नेते दि.बा.पाटील यांचे नाव देणे तसेच शेतकर्‍यांना दुप्पट नुकसानभरपाई देण्यासरखे निर्णय घेतले आहे. तसेच मुंबई, मराठवाडा आणि कोकण भागात शिवसेना मजबूत आहे तिथे विकासकामांसाठी निधीही शिंदे-फडणवीस सरकारने दिला आहे. सध्याची परिस्थिती कठीण आहे, अशी वेळ येईल याची आम्हाला कल्पना होती. असे असले तरी सध्या डॅमेज कंट्रोल सुरू असल्याचे या नेत्याने सांगितले. सहानुभूतीच्या लाटेचा शिवसेनेला फायदा होऊ यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचेही या नेत्याने म्हटले आहे. 

अधिक वाचा : Ajit Pawar: 'सत्ता आली म्हणजे मस्ती आली काय तुम्हाला?', अजित पवार प्रचंड संतापले

आणखी एका नेत्याने सांगितले की शिवसेना फोडण्याचे पातक भाजपवर पडू नये म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यानंतर शिवसेनेची १८ टक्के मते भाजपकडे वळतील. शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे अपश्रेय आपल्या पदरात पडता कामा नये यासाठीही भाजप प्रयत्न करत असल्याचे या नेत्याने म्हटले आहे. तसेच शिंदे यांनी आपणच बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे वारस असून आपलीच शिवसेना खरी असल्याचा दावा केल्याने भाजपलाही याचा फायदा होणार असल्याचे या नेत्याने म्हटले आहे.  मुंबईत मेट्रो प्रकल्पांमुळे मुंबई महानगर पालिका निवडणुकीत भाजपला फायदा होईल असा विश्वास या नेत्याने व्यक्त केला आहे. तसेच आता ओबीसी आरक्षणही मिळाल्यामुळे मित्र पक्षांची पुन्हा साथ मिळाली आहे. तसेच लवकरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला जाईल असेही या नेत्याने नमूद केले आहे. 

अधिक वाचा : Shinde Govt: दीपक केसरकर नाराज.. हवं होतं आदित्य ठाकरेंचं खातं, पण...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी