Eknath Shinde : मुंबई : शिवसेना नेते आणि सार्वजनिक मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले असून ते ३५ आमदारांसोबत सूरतच्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीसोबतच्या सरकारला त्यांनी विरोध केला असून भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची त्यांनी अट घातली आहे. असे न केल्यास एकनाथ शिंदे ३५ आमदारांची आनंद सेना स्थापन करू शकतात असे सांगण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
जर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची अट मान्य केली नाही तर एकनाथ शिंदे हे स्वतःची आनंद सेना स्थापन करू शकतात. आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांचे गुरू होते. त्यांच्या नावाने हे एकनाथ शिंदे आपल्या गटाला नाव देऊ शकतात.
Shiv Sena's Eknath Shinde goes inaccessible with 10 MLAs, Is MVA in trouble? — ANI Digital (@ani_digital) June 21, 2022
Read @ANI Story | https://t.co/yK25kHmF2T#ShivSena #EknathShinde #UddhavThackeray #maharastra pic.twitter.com/0ePIAgEIZL
आनंद दिघे ठाण्यातील शिवसेनेचे कट्टर नेते होते. दिघे यांना ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे म्हणू ओळखले जात होते. आनंद दिघे ठाण्यात समांतर न्यायालय चालवायचे आणि लोकांची कामे करायचे असे सांगितले जायचे. नुकतंच त्यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर चित्रपटातील गद्दारांना क्षमा नाही असा डायलॉगही गाजला होता.
BJP misuses its power, they are taking the Indian democracy towards untruthfulness. I am sure the truth will win. I have called a meeting of all Maharashtra Congress leaders today: Maharashtra Congress leader Nana Patole on MLC elections pic.twitter.com/KRtbJdCdYs — ANI (@ANI) June 21, 2022
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.