Sanjay Raut : दगा देणार्‍यांची यादी आमच्याकडे, संजय राऊत यांची राज्यसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया

राज्यसभा निवडणुकीत आमचा उमेदवार पराभूत झाला नाही असे आम्ही म्हणणार नाही, परंतु आमचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच काही अपक्ष आमदारांनी आम्हाला दगा दिला, त्यांची संपूर्ण यादी आमच्याकडे आहे असेही राऊत म्हणाले. 

थोडं पण कामाचं
  • राज्यसभा निवडणुकीत आमचा उमेदवार पराभूत झाला नाही
  • आमचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही
  • काही अपक्ष आमदारांनी आम्हाला दगा दिला, त्यांची संपूर्ण यादी आमच्याकडे आहे असेही राऊत म्हणाले. 

Sanjay Raut : मुंबई : राज्यसभा निवडणुकीत आमचा उमेदवार पराभूत झाला नाही असे आम्ही म्हणणार नाही, परंतु आमचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच काही अपक्ष आमदारांनी आम्हाला दगा दिला, त्यांची संपूर्ण यादी आमच्याकडे आहे असेही राऊत म्हणाले. 

राज्यसभा निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला आणि भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाला. यावर संजय राऊत म्हणाले की, संजय पवार यांना पहिल्या पसंतीची ३३ मते मिळाली हा ही आमचा एक विजय आहे. ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे. शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत कुठल्या कारणाने बाद केले याचा आम्ही शोध घेत आहोत. सुहास कांदे यांचे मत ज्या कारणाने बाद झाले त्याच कारणाने सुधीर मुनंगटीवार यांचेही मत बाद व्हायला हवे होते अशी आम्ही मागणी केली होती. मतदान करताना कुठल्याही प्रकारे धार्मिक प्रदर्शन करायचं नसतं. अशा वेळी अमरावतीच्या एका व्यक्तीने केलेले  वर्गन आक्षेपार्ह होते. त्यांचेही मत बाद ठरवायला हवे. परंतु आमचे मत बाद ठरवून पहाटे ही गोष्ट करण्यात आली. यांना पहाटे पाप कृत्य करण्याची खूप सवय आहे. 


फुटलेले आमदार

काही अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांनी आम्हाला शब्द देऊन मतदान केले नाही असा आरोप संजय राऊत यांनी केला. राऊत यांनी या आमदारांचे नावही जाहीर केली. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी आम्हाला मतदान केले नाही, तसेच देवेंद्र भुयार, शामसुंदर शिंदे, संजय मामा शिंदे  यांनीही आम्हाला मतदान केले नाही असेही राऊत यावेळी म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी