Bhagat Singh Koshyari : भाजप पुरस्कृत मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल कोश्यारींचा निषेध केलेला नाही, शिवसेना खासदार संजय राऊत यांची टीका

गुजराती आणि राजस्थानी समाजामुळेच मुंबई आर्थिक राजधानी झाली आहे असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे. आता कोश्यारी यांच्यावर सर्वस्तरातून टीका होत आहे. भारतीय जनता पक्षाची विचारसरणी ही पैश्यांच्या मागे जाणारी आहे अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच सर्व पक्षांनी कोश्यारी यांचा निषेध केला असून फक्त भाजप आणि भाजप पुरस्कृत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वक्तव्याचा निषेध केला नाही असेही राऊत म्हणाले. 

थोडं पण कामाचं
  • गुजराती आणि राजस्थानी समाजामुळेच मुंबई आर्थिक राजधानी झाली आहे असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे.
  • आता कोश्यारी यांच्यावर सर्वस्तरातून टीका होत आहे.
  • सर्व पक्षांनी कोश्यारी यांचा निषेध केला असून फक्त भाजप आणि भाजप पुरस्कृत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वक्तव्याचा निषेध केला नाही असे संजय राऊत म्हणाले.

Bhagat Singh Koshyari : मुंबई :  गुजराती (Gujarati Community) आणि राजस्थानी (Rajsthani Community) समाजामुळेच मुंबई आर्थिक राजधानी (Mumbai Financial Capital) झाली आहे असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केले आहे. आता कोश्यारी यांच्यावर सर्वस्तरातून टीका होत आहे. भारतीय जनता पक्षाची (BJP) विचारसरणी ही पैश्यांच्या मागे जाणारी आहे अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी केली आहे. तसेच सर्व पक्षांनी कोश्यारी यांचा निषेध केला असून फक्त भाजप आणि भाजप पुरस्कृत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या वक्तव्याचा निषेध केला नाही असेही राऊत म्हणाले. 

सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना नेते यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली, तेव्हा राऊत म्हणाले की, १०५ जण हुतात्मा झाल्यानंतर हा महाराष्ट्र झाला आहे. त्यानंतर ५९ लोकांनी सीमाप्रश्नी आपल्या प्राणांची आहुती दिली. या राज्यात सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक गुण्या गोविंदाने नांदतात. परंतु भारतीय पक्षाची विचारसरणी ही फक्त पैश्यांच्या मागे लागणारी आहे. पैसे वाले म्हणजे राज्य, पैसेवाले म्हणजे देश अशी भाजपची विचारसरणी आहे. परंतु महाराष्ट्र हा कष्टकर्‍यांचा आहे. जी मुंबई ज्यांनी मोठी केली, श्रीमंत केली ती व्यक्ती म्हणजे नाना शंकरशेठ, आमचे पारशी बांधव. या मुंबईत पिढानिपिढ्या गुजराती बांधव राहत आहेत आणि त्यांचे मुंबईच्या विकासासाठी योगदान आहेच असे राऊत म्हणाले.

अधिक वाचा :  Jayant Patil : दुसऱ्या राज्यांबद्दल प्रेम असणाऱ्या व्यक्तींनी खुशाल तिकडे जाऊन रहावे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची टीका

तसेच नाना शंकरशेट यांचे चरित्र आम्ही आज राज्यपाल भगत सिंह शंकर यांना पाठवणार आहोत. आजची मुंबई आर्थिक राजधानी आणि विकासाचे मॉडेल कसे झाले हे कोश्यारी यांनी शंकरशेट यांच्या चरित्रातून वाचायला हवं. ब्रिटिश काळापासून या मुंबईला आर्थिक महत्त्व प्राप्त व्हावं यासाठी नाना शंकरशेट यांच्यासारखी असंख्य मराठी माणसं त्यांनी आपली संपत्ती आणि वैभव या मुंबईला दिले. नाना शंकर शेट हे व्यापारी नव्हते, सच्चे मराठी गृहस्थ होते. ज्या पद्धतीने राज्यपालांनी हे विधान केले आहे आणि सातत्याने ते अशी विधानं करत असतात. अगदी सावित्रीबाई फुले यांचा अपमानही कोश्यारी यांनी केला होता आणि भारतीय जनता पक्षाने तोंडात मिठाची गुळणी धरून गप्प राहणे पसंत केले आहे. म्हणजे आमचे गुजराती बांधव आणि राजस्थानी बांधव नसते तर मराठी माणूस काय भिकारी असता का ? या मुंबईच्या किंवा ठाण्याच्या आर्थिक जडणघडणीत मराठी माणसाचे काहीच योगदान नाही का ? श्रम करणार्‍या मराठी माणसांबद्दल तुम्हाला एवढा द्वेष आणि तिरस्कार आहे का ?  असा सवाल राऊत यांनी विचारला.

अधिक वाचा : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शिंदे सरकारचे मंत्री शपथ घेणार, सूत्रांची माहिती

राऊत म्हणाले की, आधीच तुम्ही मराठी माणसाला पैसे कमवू देत नाही कोणी मराठी माणूस पैसे कमावत असतील तर केंद्रीय तपासयंत्रणा त्यांच्या आर्थिक नाड्या आवळतात. मराठी माणसाला रसातळाला नेण्याचे काम दिल्लीची सत्ता करत आहे. राज्यपालांच्या तोंडून चुकून का होईना त्याच प्रकारे भूमिका बाहेर पडत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक ४० आमदार हा महाराष्ट्राचा झालेला अपमानाविषयी कोणती भूमिका घेणार हा माझा पहिला प्रश्न आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर  त्यांनी  शिवसेना सोडली आहे. आता हाच महाराष्ट्र आणि मराठी माणसाने हिंदुत्वासाठी अनेक लढे दिलेले आहेत. यामुळे हिंदुत्वाचा अपमान होत नाही का ? अजूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेधही केलेला नाही असे राऊत म्हणाले. संपूर्ण महाराष्ट्रात चीड आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. फक्त शिवसेनाच नव्हे तर महाराष्ट्राभिमानी प्रत्येक राजकीय पक्षाने तीव्र धिक्कार केला आहे. अपवाद फक्त भारतीय जनता पक्ष आणि त्यांनी पुरस्कृत केलेले मुख्यमंत्री. मुख्यमंत्री जर यावर गप्प बसणार असतील तर तो या राज्यातील जनतेचाही अपमान आहे. राज्यपालांच्या व्यक्तव्याचा कुठल्याही  विपर्यास केला नाही, तसेच ज्या बॉडी लॅंग्वेजमधून राज्यपाल बोलत होते, त्यांनी अक्षरशः मराठी माणसाला तुच्छ लेखण्याचे काम केले आहे. या राज्यातील गुजराती आणि राजस्थानी बांधवानांही हे राज्यापलांचे हे वक्तव्य पटलेले नाही असेही राऊत यांनी यावेळी नमूद केले. 

अधिक वाचा :  Mumbai Crime : गोवंडीत लहान मुलांना विषप्रयोग करून दाम्पत्याची आत्महत्या

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी