Sanjay Raut : टोमॅटो सॉस लावून राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहेत, संजय राऊत यांची किरीट सोमय्यांवर टीका

किरीट सोमय्या यांना कुठलीही जखम झाली नाही, ते चेहर्‍यावर टोमॅटो सॉस लावून राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहेत अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. तसेच सत्ता गेल्यामुळे देवेंद्र फडणवीस अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी घरच्या देवासमोर हनुमान चालीसा म्हणावी त्यांचे मन शांत होईल असेही राऊत म्हणाले.

Sanjay Raut
संजय राऊत  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • किरीट सोमय्या यांना कुठलीही जखम झाली नाही, ते चेहर्‍यावर टोमॅटो सॉस लावून राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहेत
  • सत्ता गेल्यामुळे देवेंद्र फडणवीस अस्वस्थ झाले आहेत
  • त्यांनी घरच्या देवासमोर हनुमान चालीसा म्हणावी त्यांचे मन शांत होईल

Kirit Somaiya : मुंबई : किरीट सोमय्या यांना कुठलीही जखम झाली नाही, ते चेहर्‍यावर टोमॅटो सॉस लावून राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहेत अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. तसेच सत्ता गेल्यामुळे देवेंद्र फडणवीस अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी घरच्या देवासमोर हनुमान चालीसा म्हणावी त्यांचे मन शांत होईल असेही राऊत म्हणाले. (shivsena leader sanjay raut criticized kirit somaiya and bjp over attack and hanuman chalisa row)

राऊत म्हणाले की, सोमय्या यांनी चेहर्‍यावर टोमॅटो सॉस लावला आहे. हा सॉस लावून ते राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी करत आहेत. अशा मुर्खपणाकडे दुर्लक्ष केले पाहिजे असे राऊत म्हणाले. तसेच उत्तर प्रदेशमध्ये गेल्या ३ महिन्यांत १७ खून आणि बलात्कार झाले आहेत. हिटलरशाही काय आहे, हुकुमशाही काय आहे, कायदा सुव्यवस्था कोसळणे म्हणजे काय? हे आपण पाहिलं. आसाम सरकारने गुजरातमधील काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी यांना अटक केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल त्यांनी ट्विट केले. अटक करुन सुटका झाल्यावर त्यांना पुन्हा अटक झाली. या मुद्द्यांवरही देवेंद्र फडणवीस यांनी मन मोकळं केले पाहिजे. फडणवीस यांना लोकशाहीची उबळ आली आहे असे राऊत म्हणाले. तसेच सत्तेत परत येऊ शकले नाही ही त्यांची अस्वस्थता आहे. आताच नाही तर पुढील २५ वर्षे सत्तेत परत येण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे त्यांना अस्वस्थता आली आहे. ही अस्वस्थता आणि अशांतता संपवण्यासाठी फडणवीस यांनी घरी हनुमान चालीसा म्हणावी असेही राऊत म्हणाले.

देशभरात विरोधकांवर अनेक ठिकाणी हल्ले होत आहेत. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. यासाठी राज्यातील भाजपच्या नेत्यांनी पुढाकार घ्यावा. देवेंद्र फडणवीस लोकांची दिशाभूल करत आहेत, हनुमान चालीसा वाचली म्हणून कुणावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला नाही. फडणवीस वकील आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने यावर मत व्यक्त केले आहे. फडणवीस यांनी आवर्जून ते वाचावे असेही राऊत म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी