Sanjay Raut : हनुमान जयंतीला राज्यात शांतता भंग करणार्‍यांचा डाव उधळून लावला - संजय राऊत

भारतातही श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, भाजपच या लंकेला आग लावत आहे अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच राज्यात हनुमान जयंती आणि रामनवमीच्या दिवशी हिंसा भडकवण्याचे षडयंत्र होते, परंतु महाराष्ट्राच्या जनतेने हे षडयंत्र उधळून लावले असेही राऊत म्हणाले.

Sanjay Raut
संजय राऊत  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारतातही श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे
  • भाजपच या लंकेला आग लावत आहे
  • राज्यात हनुमान जयंती आणि रामनवमीच्या दिवशी हिंसा भडकवण्याचे षडयंत्र होते,

Sanjay Raut : मुंबई : भारतातही श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, भाजपच या लंकेला आग लावत आहे अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच राज्यात हनुमान जयंती आणि रामनवमीच्या दिवशी हिंसा भडकवण्याचे षडयंत्र होते, परंतु महाराष्ट्राच्या जनतेने हे षडयंत्र उधळून लावले असेही राऊत म्हणाले.

पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, की काल दिल्लीत हनुमान जयंतीच्या मिरवणुकीव हल्ला झाला. हनुमान जयंती आणि रामनवमी या दोन्ही उत्सवांवर तणावाचे वातावरण नव्हतं. परंतु या देशातील काही शक्तींनी ठरवून हे हल्ले घडवून आणण्यासाठी फार मोठं षडयंत्र रचलं होतं. महाराष्ट्रातसुद्धा हनुमान चालीसा आणि भोंगे यावरून राज्यावे वातावरण तापवण्याचे काम सुरू होते. परंतु महाराष्ट्राचे पोलीस आणि जनतेने हे षडयंत्र उधळून लावले. रामनवमी आणि हनुमान जयंती हे सण शांततेने साजरे करण्याचे दिवस आहेत. कारण या देवतांकडून संदेश आणि प्रेरणा मिळालेले आहेत. परंतु काही लोक या देवतांचा उपयोग राजकीय कारणासाठी करत आहेत. देशाच्या एकतेल आणि अखंडतेला धार्मिक विद्वेषाची चूड लावण्याचे काम करू नये असे राऊत म्हणाले.

तसेच महाराष्ट्रातील ओवैसी कोण आहेत हे हजार भोंग्यावरून स्पष्ट झाले आहे. या विषयावर चर्चा झाली असती, निवेदन देता आले असते. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत त्यानुसार कारवाई सुरू आहेत. राज्यात अशांतता निर्माण करण्यासाठी आणि भाजपला अपेक्षित राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी हे भोंग्याचे राजकारण सुरू आहे. परंतु कोल्हापुर उत्तर पोटनिवडणुकीचा निकाल आणि जनतेने ठेवलेल्या संयमामुळे हे संपूर्ण वातावरण फिरले आहे. उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने ज्या प्रकारे एमआयएमचा वापर केला तसाच भाजप महाराष्ट्रात नवहिंदुत्ववाद्यांकडून करून घेत आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम असून ते बिगर भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणात आहेत अशी माहिती राऊत यांनी यांनी दिली.  त्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही असणार आहेत. त्यांची बैठक मुंबईत होणार असून सर्वसामान्यांना भेडसवणारी महागाई, बेरोजगारीपासून अनेक विषयांवर चर्चा होणार असल्याचे राऊत म्हणाले. किरीट सोमय्या हे आयएनएस विक्रांत घोटाळ्यातील आरोपी आहेत. या घोटाळ्यातील जामिनावर सोमय्या यांची सुटका झाली आहे. एखादा आरोपी जेव्हा पत्र लिहितो की असा घोटाळा आम्ही केला नाही, १०० कोटींचा घोटाळा नसून तीन कोटींचा घोटाळा आहे असे ते म्हणाले. असे असेल तर १०० कोटींचा हिशोब आम्ही देऊ साडेतीन कोटींचा हिशोब त्यांनी द्यावा.  गुन्हेगार अशा प्रकारचे पत्रव्यवहार करत असतो.  सोमय्या यांचे एकामागोमाग घोटाळे बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही असेही राऊत यांनी नमूद केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी