पंकजा मुंडे यांना एकाकी पडण्याचा डाव, आम्हाला पंकजाची चिंता - संजय राऊत

shivsena leader sanjay raut on bjp : आम्हाला पंकजा मुंडेंची चिंता आहे. आणि आम्हाला चिंता करण्याचा अधिकार आहे. मुंडे कुटुंबाचं आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचं नातं आहे. पंकजा मुंडेंना एकाकी पाडण्याचा भाजपचा डाव आहे. असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला

shivsena leader sanjay raut on bjp
पंकजा मुंडे यांना एकाकी पडण्याचा डाव, आम्हाला पंकजाची चिंता   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंडे कुटुंबाचं आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचं नातं आहे.
  • भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांच्या जोरावर ही निवडणूक जिंकली – संजय राऊत
  • आमच्या हातात केवळ ED द्या - संजय राऊत

मुंबई : आम्हाला पंकजा मुंडेंची चिंता आहे. आणि आम्हाला चिंता करण्याचा अधिकार आहे. मुंडे कुटुंबाचं आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचं नातं आहे. पंकजा मुंडेंना एकाकी पाडण्याचा भाजपचा डाव आहे. असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आमच्या हातात जर ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, आम्हाला काय म्हणायचं आहे हे अपक्षांना माहिती आहे. कोणत्याही अपक्षाचा अवमान करण्याचा प्रश्न नाही, असंही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांना बोलताना म्हटलं आहे.'

अधिक वाचा : या सरकारी बँकेचे जुलैमध्ये होणार खासगीकरण, तुमचे खाते आहे का

भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांच्या जोरावर ही निवडणूक जिंकली – संजय राऊत

आमच्या हातात जर ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, आम्हाला काय म्हणायचं आहे हे अपक्षांना माहिती आहे. आमच्या हातात केवळ ED द्या, मग बघा असं राऊत म्हणाले. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना राऊत म्हणाले की भाजपने राज्यसभेची निवडणूक ही केंद्रीय तपास यंत्रणांच्या जोरावर जिंकली आहे.

अधिक वाचा : गेल्या वर्षी आयटीआर भरला नसल्यास यंदा जास्त टीडीएस कापणार

आम्हाला पंकजा मुंडेंची चिंता करण्याचा अधिकार आहे – संजय राऊत

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, पंकजा मुंडेंना एकाकी पाडण्याचा भाजपचा डाव आहे. आम्हाला पंकजा मुंडेंची चिंता आहे. आणि आम्हाला चिंता करण्याचा अधिकार आहे. मुंडे कुटुंबाचं आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचं नातं आहे. महाराष्ट्रात भाजपा - शिवसेना युती टिकवण्याचं श्रेय नक्कीच गोपीनाथ मुंडे यांना जातं. असं राऊत राऊत यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा : लहानपणीचं आई वारली, वडील गेले तुरुंगात, तरीही मुलगा झाला.... 

राज्यसभेची सहावी जागा चुरशीची होती.  

राज्यसभेच्या ६ जागेचा अंतिम निकाल समोर आला आहे. शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांचा दणदणीत विजय झाला. भाजपच्या ३ उमेदवारांचा विजय झाला आहे. सहाव्या जागेवर भाजपचे धनजंय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार उमेदवार होते. धनंजय महाडिकांनी हा विजय खेचून आणला. फडणवीसांची खेळी यशस्वी ठरली. महाविकास आघाडीचे १० अपक्ष फोडण्यात फडणवीसांना यश आलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी