Sanjay Raut : महिलेला ७० सेकंदात २८ शिव्या, संजय राऊत यांची धक्कादायक ऑडिओ टेप?

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 29, 2022 | 20:13 IST

Sanjay Raut : एक ऑडिओ टेप जगजाहीर झाली आहे. या टेपमधील आवाज शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार आणि नेते संजय राऊत यांची असल्याचा आरोप एक महिला करत आहे. टेपमध्ये ७० मिनिटांत २५ पेक्षा जास्त शिव्या ऐकू येत आहेत.

Shivsena Leader Sanjay Raut shocking audio tape
संजय राऊत यांची धक्कादायक ऑडिओ टेप? 
थोडं पण कामाचं
  • महिलेला ७० सेकंदात २८ शिव्या
  • संजय राऊत यांची धक्कादायक ऑडिओ टेप?
  • नवनीत राणा म्हणतात, तो आवाज संजय राऊतांचाच... 

Sanjay Raut : मुंबई : एक ऑडिओ टेप जगजाहीर झाली आहे. या टेपमधील आवाज शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार आणि नेते संजय राऊत यांची असल्याचा आरोप एक महिला करत आहे. टेपमध्ये ७० मिनिटांत २५ पेक्षा जास्त शिव्या ऐकू येत आहेत. या प्रकरणात संबंधित महिलेने गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्या सांगण्यावरून काहीजण मला त्रास देत आहेत, धमक्या देत आहेत. या प्रकरणात वारंवार पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न पण तक्रार घेतली जात नव्हती. अखेर १६ जुलै २०२२ रोजी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असे महिलेने सांगितले.

Gujarat: गुजरातच्या भाजप सरकारमधील मंत्र्यावर बलात्काराचा आरोप

याआधी तक्रारदार महिलेला काही दिवस तुरुंगात राहावे लागले होते. खोट्या प्रकरणात अडकवून मला तुरुंगात टाकले असे संबंधित महिलेचे म्हणणे होते. आता ऑडिओ टेप जगजाहीर होताच संबंधित महिलेने धमक्या देणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मुंबई पोलिसांनी महिलेने केलेल्या तक्रारीचा तपास करणार असल्याचे जाहीर केले. ऑडिओ टेप प्रकरणात कायदेशीर पद्धतीने कारवाई करण्याचे संकेत पोलीस देत आहेत. 

काय आहे प्रकरण ?

महिलेने संजय राऊत यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. छळ वारंवार होत आहे. फोन करून धमकावले जात आहे असेही महिलेचे म्हणणे आहे. या प्रकरणात महिलेने पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. महिलेच्या वकिलाने तिच्या अशिलाच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन सुरू आहे असा गंभीर आरोप संजय राऊत यांच्यावर केला आहे.

नवनीत राणा म्हणतात, तो आवाज संजय राऊतांचाच... 

अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी असा दावा केला आहे की, व्हायरल ऑडिओ संजय राऊत यांचाच आहे. जर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला विचारलं की हा आवाज कोणाचा आहे तर तो देखील सांगेल की, तो आवाज संजय राऊत यांचाच आहे असे नवनीत राणा म्हणाल्या.

संजय राऊत यांनी फोन उचलला नाही

टाइम्स नाउ नवभारतच्या प्रतिनिधीने संध्याकाळी टेप जगजाहीर होताच संजय राऊत यांना फोन केला. पण संपर्क झाला नाही. तीन वेळा प्रयत्न करण्यात आला पण समोरून फोन रिसिव्ह झाला नाही. यामुळे संजय राऊत यांची बाजू अद्याप समजलेली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी