Maharashtra Winter Session : भास्कर जाधवांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल, विरोधी पक्षांकडून निलंबनाची मागणी, विधीमंडळात गदारोळ

bhaskar jadhava mimic pm narendra modi विधीमंडळात हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये खडाजंगी झाली. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करून १५ लाख रुपयांचे काय झाले असा सवाल केला. तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चिडले आणि त्यांनी भास्कर जाधव यांना निलंबीत करावे अशी मागणी केली.

bhaskar jadhav
भास्कर जाधव   |  फोटो सौजन्य: YouTube
थोडं पण कामाचं
  • हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये खडाजंगी
  • भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची केली नक्कल
  • विरोधी पक्षाने भास्कर जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली. 

Maharashtra Winter Session :मुंबई : विधीमंडळात हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये खडाजंगी झाली. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करून १५ लाख रुपयांचे काय झाले असा सवाल केला. तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चिडले आणि त्यांनी भास्कर जाधव यांना निलंबीत करावे अशी मागणी केली. (bhaskar jadhava mimic pm narendra modi )

सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या या पवित्र्यामुळे विधीमंडळात गदारोळ माजला. यावेळी भास्कर जाधव यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींची नव्हे तर तत्कालीन भाजप नेत्याची नक्कल केली असे स्पष्टीकरण दिले. त्यानंतरही विरोधी पक्षाने भास्कर जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली. 

१५ लाख रुपयांचे आश्वासन

राज्यातील ग्राहकांना १०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन आपण दिले होते असे ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले. परंतु हे आश्वासन आपल्याला पूर्ण करता आले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळा पैसा भारतात आणल्यावर प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये येतील हे आश्वासन पूर्ण केले नाही असे राऊत म्हणाले. त्यावर विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी असे म्हणालेच नाहीत असे सांगितले. तेव्हा शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदींची नक्कल करत या आश्वासनाची आठवण करू दिली.

भास्कर जाधव यांनी केला अंगविक्षेप 

राऊत यांचे बोलणे झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करत त्यांनी १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते असे सांगितले. तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांच्यावर आक्षेप घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही असे फडणवीस म्हणाले. तसेच सभागृहात कुठल्याही नेत्याचा असा अपमान होणे चुकीचे आहे असेही फडणवीस म्हणाले. भास्कर जाधव यांचे निलंबन व्हावे अशी मागणी फडणवीस यांनी केली. 

आम्हाला पण नकला करता येतात- मुंनगटीवार


यावेळी भाजपचे आमदार सुधीर मुंनगटीवार यांनी भास्कर जाधव यांच्यावर आक्षेप नोंदवला. सभागृहाबाहेर अशा प्रकारे नक्कल करणे वेगळे परंतु सभागृहात प्रत्येक नेत्याचा सन्मान राखला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. आम्हाला पण नकला करता येतात पण आमच्यावर तसे संस्कार झाले नाहीत असे मुंनगटीवर म्हणाले.

कार्यवाही करावी

जयंत पाटील यांनी यावेळी भास्कर जाधव यांनी अंगविक्षेप केल्याचे आपण पाहिले नाही, परंतु हे सर्व रेकॉर्ड झाले आहे. त्यामुळे सर्व तपास करून कारवाई करावी आणि आता कामकाज सुरू करावे अशी मागणी केली. परंतु आमच्याकडून अशा प्रकारे वर्तन झाल्यास अशाच प्रकारे तपास आणि चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी