Mangesh Kudalkar : शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची मुंबईत आत्महत्या

Mangesh Kudalkar : शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची मुंबईत आत्महत्या

Breaking News
शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची मुंबईत आत्महत्या  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या.
  • रजनी कुडाळकर असे त्यांचे नाव होते.
  • रजनी कुडाळकर मंगेश कुडाळकर यांच्या दुसर्‍या पत्नी होत्या.

Mangesh Kudalkar Wife Sucide : मुंबई : शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी कुडाळकर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  कुडाळकर हे कुर्ला विधानसभेचे आमदार आहेत. कुर्ल्यातील नेहरु नगर भागात कुडाळकार राहत होते. या घरात रजनी कुडाळकार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

रजनी कुडाळकर या ४२ वर्षाच्या होत्या. त्या मंगेश कुडाळकर यांच्या दुसर्‍या पत्नी होत्या. पहिल्या पत्नीचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर कुडाळकर यांनी रजनी यांच्याशी विवाह केला होता. या प्रकरणी नेहरु नगर पोलीस स्थानकात अकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कौटुंबिक वादातून रजनी कुडाळकर यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे, असे असले तरी याबाबत कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी