Saamana Article : सामनातून चक्क नारायण राणे, राज ठाकरे भुजबळांचे कौतुक; एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेचे प्रहार

Saamana Article : गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते, परंतु ऐनवेळी चर्चा फिस्कटली असा गौप्यस्फोट आज शिवसेनेचे मुखपत्र सामना दैनिकात करण्यात आला आहे. आनंद दिघे यांनी ठाण्यात शिवसेना वाढवली परंतु एकनाथ शिंदे यांनी त्याच ठाण्यात शिवसेनेला सुरुंग लावला अशी टीकाही आजच्या सदरात करण्यात आली आहे.

saamana article
दै. सामना रोखठोक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते, परंतु ऐनवेळी चर्चा फिस्कटली
  • आनंद दिघे यांनी ठाण्यात शिवसेना वाढवली परंतु एकनाथ शिंदे यांनी त्याच ठाण्यात शिवसेनेला सुरुंग लावला
  • अशी टीकाही आजच्या सदरात करण्यात आली आहे.

Saamana Article : मुंबई : गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते, परंतु ऐनवेळी चर्चा फिस्कटली असा गौप्यस्फोट आज शिवसेनेचे मुखपत्र सामना दैनिकात करण्यात आला आहे. आनंद दिघे यांनी ठाण्यात शिवसेना वाढवली परंतु एकनाथ शिंदे यांनी त्याच ठाण्यात शिवसेनेला सुरुंग लावला अशी टीकाही आजच्या सदरात करण्यात आली आहे. इतकेच नाही तर एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना शिवसेना सोडून गेलेल्या नारायण राणे, राज ठाकरे आणि छगन भुजबळ यांचे कौतुकही या लेखात करण्यात आले आहे. (shivsena mouthpiece weekly column rokhthok criticized ekanth shinde over party)

अधिक वाचा :  Mumbai Railway : पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यांच्या संख्येत वाढ, 1375 ऐवजी 1383 फेऱ्या होणार

ठाण्यात शिवसेनेला खिंडार

एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात शिवसेनेला खिंडार पाडले असा आरोप सामनातून करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्याचे उद्धव ठाकरे यांनी ठरवले. त्यास शिंदे यांनी कडाडून विरोध केला व काँग्रेसमधून आयत्या वेळी आलेल्या रवी फाटक यांना उमेदवारी देण्यास भाग पाडले. फाटक हे स्थानिक नव्हते, पण वागळे इस्टेट भागात स्वतःस त्रास होऊ नये म्हणून म्हस्के यांच्या जागी काँग्रेसचे फाटक लादले. ही जागा तेव्हा शिवसेनेने गमावली ती शिंदे यांच्यामुळेच. हे फाटक राणेंसोबत काँग्रेसमध्ये गेले होते व ठाण्यातील शिवसैनिकांची डोकी त्यांनी फोडली होती. हा प्रसंग बोलका आहे. प्रकाश परांजपे यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव आनंद परांजपे खासदार झाले. आनंद परांजपे यांनी शिवसेना सोडावी असे अंतर्गत वातावरण शिंदे यांनी तयार केले. कल्याण-डोंबिवलीच्या मतदारसंघातून जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना उमेदवारी द्यावी असे उद्धव ठाकरे यांनी नक्की केले, पण शिंदे यांनी लांडगे यांना विरोध केला व राजकारणात, शिवसेनेत नसलेले आपले डॉक्टर चिरंजीव श्रीकांत यांना उमेदवारी देण्यास भाग पाडले असेही या लेखात म्हटले आहे. 

अधिक वाचा :  Ajit Pawar कार्यक्रमाच्या आयोजकालाचं अजित पवारांनी मंचावर झापले


काँग्रेस सोबत संधान

भाजपसोबत युती तोडून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत संधान बांधले म्हणून आपण बंडखोरी केली असे कारण सांगत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली होती. परंतु जेव्हा राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार होते तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेसश्रेष्ठींना भेटून काँग्रेसमध्ये येण्याचा विचार करत होते असा आरोप सामनातून करण्यात आला आहे. आजच्या लेखात म्हटले आहे की, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनीही आता एकनाथ शिंदे हे सत्तेसाठी किती उतावीळ झाले होते याचा स्फोट केला आहे. ‘‘भाजप-शिवसेना ‘युती’चे सरकार असताना व फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेनेचे एक शिष्टमंडळ काँग्रेस नेत्यांना भेटले व नव्या सरकार स्थापनेचा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता (2014). त्या शिष्टमंडळात स्वतः एकनाथ शिंदे होते’’, असे चव्हाण यांनी सांगितले. म्हणजे तेव्हा शिंदे यांनी काँग्रेसबरोबर जाण्यास विरोध केला नव्हता व काँग्रेसबरोबर गेल्याने ‘ठाकरे-दिघे’ यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा वारसा मोडून पडेल असे त्यांना वाटले नव्हते. त्याच काळात त्यांनी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी संधान बांधले होते व 15 ते 20 आमदारांसह ‘येतो’, गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपद द्या ही चर्चा त्यांनी सुरू केली होती, असे ठामपणे सांगणारे आहेत. त्याला आजही प्रत्यक्षदर्शी आहेत. शिंदे काँग्रेसशी चर्चा करीत आहेत ही पहिली खबर (एफआयआर) तेव्हा भाजपनेच उद्धव ठाकरे यांच्याकडे नोंदवली होती. ‘ईडी’च्या भीतीने शिंदे हे भाजपमध्ये गेले असा आरोप सामनातून करण्यात आला आहे.  

अधिक वाचा :  मुंबईसाठी तलावांमध्ये 380 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा

राणे आणि राज ठाकरे यांचे कौतुक

नारायण राणे, राज ठाकरे आणि छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली. त्यापैकी राणे आधी काँग्रेस आणि आता भाजपमध्ये सामील झाले आहेते. भुजबळ तेव्हा काँग्रेससोबत गेले आणि शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर ते राष्ट्रवादीसोबत राहिले. तर राज ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर स्वतःच्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची स्थापना केली होती. या नेत्यांनी शिवसेना सोडली परंतु शिवसेनेवर हक्क सांगितला नाही असे म्हणत सामनामध्ये या तीन नेत्यांचे कौतुक केले. आजच्या रोखठोकमध्ये म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांचा उद्दामपणा भाजपच्या पाठिंब्यातून निर्माण झाला आहे. आमचीच शिवसेना व आमचाच दसरा मेळावा. महाराष्ट्रात उभी फूट पाडण्यासाठी शिंदे यांनी आज हयात नसलेल्या स्व. आनंद दिघे यांचा आधार घेतला. दिघे यांची आठवण शिंदे यांना 21 वर्षांनंतर झाली. दिघे यांच्या आपण किती निकट होतो हे दाखविण्यासाठी शिंदे यांनी काही कोटी खर्च करून ‘धर्मवीर’ सिनेमा काढला. सिनेमावर खर्च झाला त्यापेक्षा जास्त खर्च सिनेमाच्या म्हणजे स्वतःच्या प्रसिद्धीवर केला. हा सिनेमा आनंद दिघे यांच्यावर होता की शिंद्यांवर, असा प्रश्न हा सिनेमा पाहून अनेकांना पडला. कारण या सिनेमाचे प्रयोग सुरू असतानाच शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या पाठीत खंजीर खुपसला व शिवसेना फोडली. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून टीव्हीवर या सिनेमाचा भडीमार सुरू आहे तो फक्त शिंदे यांच्या प्रसिद्धीसाठी. या चित्रपटाद्वारे दिघे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हेच एक अद्भुत व्यक्तिमत्त्व असल्याचे दाखविण्यात आले. चित्रपटातील अनेक प्रसंग म्हणजे कथोकल्पित, कल्पनाविलास यांचे टोक आहे. या चित्रपटानंतर शिंदे यांनी आनंद दिघे यांची ढाल पुढे करून शिवसेना फोडली असेही रोखठोकमध्ये म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी