शिवसेना खासदाराच्या चारचाकीने संजय गांधी उद्यानातील हरणाला चिरडलं

मुंबई
Updated Dec 02, 2019 | 17:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या चारचाकीने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एका हरणाला चिरडले.

shivsena MP car
शिवसेना खासदाराच्या चारचाकीने संजय गांधी उद्यानातील हरणाला चिरडले  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या चारचाकीने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एका हरणाला चिरडले.
  • ही घटना बुधवारी सायंकाळी ६ ते ६.३० च्या सुमारास घडली.
  • ही कार जप्त करण्यात आली असून वनअपराध अंतर्गत गुन्हादेखील नोंदविण्यात आला आहे.

मुंबई: शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या चारचाकीने बुधवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एका हरणाला चिरडल्याची बातमी आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर भरधाव वाहन चालविल्याबद्दल आणि गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आहे अशी माहिती उद्यानाचे मुख्य संरक्षक आणि डायरेक्टर अनवर अहमद यांनी दिली आहे. संजय गांधी उद्यानातील काही लोकांच्या सांगण्यानुसार, ही घटना बुधवारी घडली. राजेंद्र गावित यांच्या नावे नोंद असलेली एसयूव्ही या चारचाकीने एका ठिपकेदार हरणाला चिरडले होते. उद्यानाच्या जवळच असलेल्या त्रिमूर्ती स्टेशनजवळील रस्ता पार करताना ही घटना घडल्याची माहिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी सायंकाळी ६ ते ६.३० च्या सुमारास घडली. ही कार उद्यानाच्या मुख्य दरवाजाकडे जात होती. त्याचवेळी गांधी टेकडीजवळ या कारने हरणाला जोरदार धडक दिली. कारचालकाने त्वरित या घटनेची माहिती मुख्य प्रवेशद्वाराकडे कळविली. त्यानंतर हरणाला रूग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.

दरम्यान, ही कार जप्त करण्यात आली असून वनअपराध अंतर्गत गुन्हादेखील नोंदविण्यात आला आहे. हरणाला टक्कर दिलेली ही सफेद रंगाची एसयूव्ही उद्यानाच्या डायरेक्टरच्या कार्यालयाबाहेर जप्त करून ठेवण्यात आली आहे. उद्यानातील रस्त्यांवर वाहन चालविताना इथले नियम काटेकोरपणे पाळले जावेत असे आवाहन आम्ही नेहमी वाहनचालकांना करतो. पर्यटकांमध्येही याबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच यासाठी एक खास अभियान राबविण्याची योजनाही आखत असल्याचे उद्यानाचे संचालक अनवर अहमद यांनी सांगितले.

उद्यानात फिरत असलेल्या लोकांनी अनेकदा भरधाव वेगाने गाड्या चालत असल्याबाबत तक्रारी केल्या आहेत. मात्र अधिकाऱ्यांच्या सांगण्यानंतरही गाड्यांचा वेग कमी होताना दिसत नाही. स्वत:ची गाडी उद्यानात फिरण्यासाठी आणल्यास ती २० किमी प्रतितास वेगाने चालविण्याचे आदेशही उद्यान प्रशासनाने दिले आहेत. मात्र त्याचे पालन कोणीही करत नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. परिणामी, इथल्या प्राण्यांचा जीव धोक्यात असल्याचे चित्र आहे. मार्च २०१७मध्ये रिव्हर मार्च ग्रुपच्या एका सदस्याने दाखल केलेल्या आरटीआयअंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एकूण ८ हरीण मारले गेले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी