Sanjay Raut : ज्यांनी पुरावे दाखवायला लावले त्यांना ही पापं फेडावी लागतील, शिवसेना खासदार संजय राऊत यांची टीका

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नोटीस बजावली आहे. खरी शिवसेना कुणाची आहे याचे पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून या प्रकरणी ८ तारखेला सुनावणी होणार आहे. ज्या लोकांनी शिवसेना पक्षासाठी पुरावे दाखवायला लावले त्यांना आई जगदंबा आणि जनता माफ करणार नाही असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच ज्यांनी पुरावे दाखवायला लावले त्यांना ही पापं फेडावी लागतील असेही राऊत म्हणाले.

थोडं पण कामाचं
  • ज्या लोकांनी शिवसेना पक्षासाठी पुरावे दाखवायला लावले त्यांना आई जगदंबा आणि जनता माफ करणार नाही
  • ज्यांनी पुरावे दाखवायला लावले त्यांना ही पापं फेडावी लागतील
  • महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसांच्या मनामनात आणि कणाकणात शिवसेना आहे हा पुरावा आहे.

Sanjay Raut : मुंबई :  निवडणूक आयोगाने ( Election commission) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief uddhav thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना नोटीस बजावली आहे. खरी शिवसेना कुणाची आहे याचे पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून या प्रकरणी ८ तारखेला सुनावणी होणार आहे. ज्या लोकांनी शिवसेना पक्षासाठी पुरावे दाखवायला लावले त्यांना आई जगदंबा आणि जनता माफ करणार नाही असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. तसेच ज्यांनी पुरावे दाखवायला लावले त्यांना ही पापं फेडावी लागतील असेही राऊत म्हणाले.

अधिक वाचा : Harish Salve Argument: 'ज्यांना 20 आमदारांचा पाठिंबा नाही त्यांना सीएम करणार?', पाहा हरीश साळवेंचा सुप्रीम कोर्टातील युक्तिवाद

आज मुंबईत राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा राऊत म्हणाले ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी ५६ वर्षांपूर्वी महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी शिवसेनेची स्थापना केली, मराठी माणसांच्या न्यायहक्कासाठी या पक्षाची स्थापना झाली आणि हिंदुत्वाचा विचार करून ही संघटना पुढे गेली. या शिवसेनेवर फुटीरांनी खरी शिवसेना कोणाची हे पुरावे सादर करण्याची वेळ आणावी यासारखं महाराष्ट्राचे दुर्दैव नाही. फुटलेल्या नेत्यांनी वेगळा गट स्थापन केला, नवीन संसार सुरू व्यवस्थित करा. परंतु दिल्लीश्वरांना शिवसेना संपवायची आहे. या  फुटीर नेत्यांचा वापर महाराष्ट्राविरोधात आणि मराठी माणसांच्या विरोधात होत आहे असे राऊत म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते आहेत आणि ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे. मराठी माणसांच्या हृदयात शिवसेनेला स्थान आहे. ज्यांनी आमच्यावर पुरावे सादर करण्याची वेळ आणली,  त्यांना हे पापं फेडावी लागतील. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घातले आहेत, ज्यांनी ज्यांनी शिवसेनेच्या पाठीवर खंजीर खुपसले आहेत आणि ज्यांनी शिवसेनेवर पुरावे सादर करण्याची वेळ आणली आहे, त्यांना ना नियती माफ करणार, ना आई जगदंबा माफ करणार, ना या राज्यातील जनता माफ करणार असा घणाघात राऊत यांनी केला.

अधिक वाचा : Shinde Vs Shiv Sena: शिवसेनेची बाजू मांडताना जोरदार युक्तिवाद, सिंघवींनी केली 'ही' मोठी मागणी

राऊत म्हणाले की, या महाराष्ट्रातील ११ कोटी जनता हाच पुरावा आहे. सीमाप्रश्नासाठी शिवसेनेचे ५९ लोक हुतात्मा झाले, हजारो आंदोलनासाठी आमचा मराठी माणूस शहीद झाला, तुरुंगात गेला हा पुरावा आहे. ९२-९३ च्या दंगलीत अनेक खटले आमच्यावर दाखल झाले अनेक लोक शहीद झाले, हा पुरावा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसांच्या मनामनात आणि कणाकणात शिवसेना आहे हा पुरावा आहे. १० - २० लोक फोडले पैसे देऊन आणि दहशत दाखवून. हा पुरावा होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पक्ष पुढे चालला आहे. ज्यांनी शिवसेना फोडली आणि आता त्या शिवसेनेसाठी पुरावे द्यावे लागत आहेत. वर बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा पाहतोय आणि तो तुम्हाला माफ करणार नाही. हे बंडखोर लोक आज घोड्यावर बसलेले आहेत, जनता तुमची गाढवावरून धिंड काढल्याशिवाय राहणार नाही असेही राऊत म्हणाले. 

अधिक वाचा :  Devendra Fadnavis: 'मी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन...', 'त्या' घटनेनंतर फडणवीसांचा सूर बदलला!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी