ShivSena : 'एक झेंडा, एक नेता आणि एक मैदान..”, शिंदेंनंतर आता ठाकरेंच्याही दसरा मेळाव्याचा टीझर

Dasara Melava :मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांनी ५ ऑक्टोबरला होणाऱ्या दसरा मेळाव्याची तयारी केली आहे. या मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गट आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे.

ShivSena : 'एक झेंडा, एक नेता आणि एक मैदान..”, शिंदेंनंतर आता ठाकरेंच्याही दसरा मेळाव्याचा टीझर
ShivSena : 'One flag, one leader and one ground..', after Shinde now Thackeray's Dussehra gathering teaser  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बीकेसीत सभा होणार
  • ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर
  • शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाच्या मेळाव्याचा टीझर आपल्या ट्विटरवर प्रसिद्ध केला

मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे या दोन गटांमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून सुरू असलेल्या शिवाजी पार्क मेळाव्यावर दोन्ही गट दावा सांगत आहेत. न्यायालयाने उद्धव गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली होती. ५ ऑक्टोबरला विजयादशमीला उद्धव ठाकरे या सभेला संबोधित करणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी मैदानावर मेळावा घेण्याची तयारी केली आहे. गुरुवारी शिंदे गटाकडून टीझर लाॅंच केल्यानंतर आज ठाकरे गटाकडून टीझर लाॅंच केला आहे. (ShivSena : 'One flag, one leader and one ground..', after Shinde now Thackeray's Dussehra gathering teaser)

अधिक वाचा : ​Pankaja Munde : नवरात्रौत्सवात पंकजामुळे 'झिंग झिंग झिंगाट'वर थिरकल्या; डान्सचा Video व्हायरल

दसरा मेळाव्यात ताकद दाखवण्यासाठी शिंदे गटाने जोर लावला असून शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी महाराष्ट्रभरातून समर्थकांना जमवण्याची जबाबदारी त्यांच्या गटातील आमदार आणि खासदारांवर देण्यात आली आहे. 

अधिक वाचा : भाजप खासदाराला 3 कोटींचा गंडा, मुंबईतील व्यापाराने लावला चांगलाच चूना 

शिवरायांचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा, हिंदू धर्माचा भगवा झेंडा सर्वत्र फडकायला हवा, असे बाळासाहेब ठाकरे बोलताना ऐकायला मिळतात. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. 'एक नेता, एक बाजू, एक विचार, एकलव्य, एकनाथ' या घोषवाक्यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ चित्रासह बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या फोटोसह एकनाथ शिंदे यांचा फोटो या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. 

ठाकरे गटाकडूनही ट्विट केला आहे. त्यामध्ये  करत म्हटले आहे की, एक नेता, एक झेंडा, एक मैदान... शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा! सेनेकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला असून, त्यात हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोने सुरूवात केली. त्यात लिहले आले आहे की, "निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार, महाराष्ट्राची ताकत दिसणार" अशा ओळी टिझरमध्ये लिहण्यात आल्या आहेत. त्यानंतर "जमलेल्या माझ्या तमाम हिंदू भगिनींनो-मातांनो" बाळासाहेबांचे हे उद्गार देखील त्यात करण्यात आले आहे. तसेच शिवसेनेचा हा मेळावा ऐतिहासिक होणार असल्याचे देखील टिझरमध्ये म्हटले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी