शिवसैनिकाने 'मातोश्री'च्या आवारात घेतला अखेरचा श्वास

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 07, 2022 | 15:06 IST

Shivsena Party Worker Bhagawan Kale Died Due To Heart Attack at Uddhav Thackeray Matoshree Residence Mumbai : उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या शिवसैनिकाचे निधन झाले. शिवसैनिकाच्या मृत्यूची बातमी पसरली. अनेकांनी दुःख व्यक्त केले. शिवसैनिकांना तर मोठा धक्का बसला.

Shivsena Party Worker Bhagawan Kale Died Due To Heart Attack at Uddhav Thackeray Matoshree Residence Mumbai
शिवसैनिकाने 'मातोश्री'च्या आवारात घेतला अखेरचा श्वास  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • शिवसैनिकाने 'मातोश्री'च्या आवारात घेतला अखेरचा श्वास
  • शिवसैनिकाच्या मृत्यूची बातमी पसरली, अनेकांनी दुःख व्यक्त केले
  • शिवसैनिकांना धक्का बसला

Shivsena Party Worker Bhagawan Kale Died Due To Heart Attack at Uddhav Thackeray Matoshree Residence Mumbai : मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राज्याच्या विधीमंडळाचे नेते एकनाथ शिंदे हेच शिवसेना विधीमंडळ पक्षाचे नेते असल्याचा निर्णय विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. यानंतर शिवसेना संघटनेची नव्याने रचना करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. या कामाचा भाग म्हणून ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना भेटत आहेत. या भेटीगाठींदरम्यान एक दुःखद घटना घडली. उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या शिवसैनिकाचे निधन झाले. । ठाकरे विरूद्ध शिंदे

मोदींच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचा राजीनामा, श्रीकांत शिंदेंची केंद्रात वर्णी?

मातोश्री बंगल्याच्या आवारात उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत भगवान काळे हे शिवसेना पदाधिकारी बसले होते. त्यांना अस्वस्थ वाटू लागले. तब्येत बिघडल्यामुळे त्यांना तातडीने वांद्रे कलानगर येथील जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. 

भगवान काळे हे शहापूर तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते होते. ते अनेक वर्षांपासून शिवसेनेत आहे. शिवसेनेचे ५५ पैकी ४१ आमदार जाहीरपणे नाराजी व्यक्त करू लागले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे जाहीर केले. 

उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भेटणार असे जाहीर केल्यानंतर इतर अनेक शिवसैनिकांप्रमाणे शहापूर तालुक्यातील वाशाळा गावातील भगवान काळे आपल्या कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर पोहोचले होते. उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत असलेल्या भगवान काळे यांना अस्वस्थ वाटू लागले. तब्येत बिघडल्याचे पाहून त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. 

शिवसैनिकाच्या मृत्यूची बातमी पसरली. अनेकांनी दुःख व्यक्त केले. शिवसैनिकांना तर मोठा धक्का बसला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी