Rajyasabha Election : राज्यसभेसाठी शिवसेनेकडून उमेदवार जाहीर, या शिवसैनिकाच्या गळ्यात पडली उमेदवारी

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने संभाजीराजे भोसले यांना ऑफर दिली होती. परंतु संभाजीराजे यांनी यावर काहीच प्रतिक्रिया न दिल्याने आता शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केला आहे. शिवसेनेने संजय पवार यांन राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.

Breaking News
Rajyasabha Election : राज्यसभेसाठी शिवसेनेकडून उमेदवार जाहीर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने संभाजीराजे भोसले यांना ऑफर दिली होती.
  • परंतु संभाजीराजे यांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
  • आता शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केला आहे.

Rajyasabha Election  : मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने संभाजीराजे भोसले यांना ऑफर दिली होती. परंतु संभाजीराजे यांनी यावर काहीच प्रतिक्रिया न दिल्याने आता शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केला आहे. शिवसेनेने संजय पवार यांन राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.

कोण आहेत संजय पवार

संजय पवार हे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख असून त्यांनी यापूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केले आहे. गेली ३० वर्षे ते शिवसेनेत पवार सक्रिय असून पवार यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.

संभाजीराजेंकडून प्रतिसाद नाही

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी संभाजीराजे भोसले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. तसेच सर पक्षीयांनी आपल्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. परंतु संभाजी राजेंनी शिवसेनेत जाहीर प्रवेश घ्यावा आम्ही त्यांना राज्यसभेवर पाठवू अशी ऑफर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. तसेच शिवसेना प्रवेशासाठी संभाजीराजेंना मातोश्रीवरही निमंत्रित करण्यात आले होते. परंतु संभाजीराजेंनी यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

अधिकृत घोषणा नाही

शिवसेनेने राज्यसभेसाठी संजय पवार यांना उमेदवारी दिलेली आहे. असे असले तरी याबाबत पक्षाकडून अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु पवार यांच्या नावावर शिकामोर्तब करण्यत आले अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी