Sambhaji Raje Bhosale : संभाजीराजेंना मोठा धक्का, राज्यसभेसाठी शिवसेना आपले दोन उमेदवार देणार असल्याचे संकेत

shivsena will field two candidates in rajya sabha elections : संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या आवाहनानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजांच्या आव्हानाला प्रतिसाद दर्शवला असून, परंतु राज्यसभेसाठी शिवसेना आपले दोन उमेदवार देणार असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी संकेत दिल्याने संभाजीराजे छत्रपती यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

shivsena will field two candidates in rajya sabha elections
राज्यसभेसाठी शिवसेना आपले दोन उमेदवार देणार असल्याचे संकेत   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जुलैमध्ये राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणूक होणार
  • संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे केले जाहीर
  • राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी राजे यांचा कार्यकाळ नुकताच संपला

Sambhaji Raje Bhosale : मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वीच आपण राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार असल्याचे जाहीरपणे बोलून दाखवलं आहे. अशातच जुलैमध्ये राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणूक होणार असून, राज्यसभेच्या या जागासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस , आणि शिवसेनेच्या प्रयेकी १ जागा असून, भाजपच्या २ जागा निवडून येण्याइतके संख्याबळ आहे. दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असून, यासाठी त्यांनी आपल्याला सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा असं आवाहन देखील केलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या आवाहनानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजांच्या आव्हानाला प्रतिसाद दर्शवला असून, परंतु राज्यसभेसाठी शिवसेना आपले दोन उमेदवार देणार असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी संकेत दिल्याने संभाजीराजे छत्रपती यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

अधिक वाचा ; सोन्याच्या भावात झाली वाढ, चांदी मात्र घसरली, पाहा ताजा भाव

नेमकं काय म्हणाले होते संभाजीराजे छत्रपती?

छत्रपती संभाजी राजे राज्यसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार आहेत. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन संभाजी राजे यांनी ही घोषणा केली. स्वराज्य नावाच्या संघटनेची स्थापना करणार असेही त्यांनी जाहीर केले. लोकांना स्वराज्यात एकत्र करण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा करणार असेही संभाजी राजे यांनी जाहीर केले. जिथे अन्याय होतो तिथे लढा देणार. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांचे विचार पोहोचविण्यासाठी स्वराज्य ही संघटना काम करणार असल्याचे संभाजी राजे यांनी जाहीर केले. स्वराज्य या संघटनेचे भविष्यात राजकीय पक्षात रुपांतर होऊ शकते. पण या संदर्भातला निर्णय योग्य वेळी घेऊ असे संभाजी राजे म्हणाले होते.

अधिक वाचा ; IPLमध्ये 100 हून अधिक विकेट्स घेणारा अक्षर ठरला चौथा खेळाडू

राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी राजे यांचा कार्यकाळ नुकताच संपला

राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी राजे यांचा कार्यकाळ नुकताच संपला. कार्यकाळ संपल्यानंतर १२ मे रोजी पत्रकार परिषद घेऊन भावी योजना जाहीर करणार असल्याचे संभाजी राजे म्हणाले होते. घोषणेनुसार संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि  राज्यसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार असल्याचे जाहीर केले.

अधिक वाचा : आजपासून सुरू होईल या राशींचे चांगले दिवस, भाग्योदय होणार 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी