Mumbai Local : मुंबईच्या लोकलमध्ये धक्कादायक घटना, मोटरमन चक्कर येऊन पडला आणि...

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Feb 02, 2023 | 08:56 IST

Shocking incident in Mumbai local, motorman fainted : मुंबईच्या लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली. चर्चगेट ते बोरिवली असा प्रवास करत असलेल्या लोकलचा मोटरमन चक्कर येऊन पडला.

Shocking incident in Mumbai local, motorman fainted
मुंबईच्या लोकलमध्ये धक्कादायक घटना  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबईच्या लोकलमध्ये धक्कादायक घटना, मोटरमन चक्कर येऊन पडला आणि...
  • मोटरमनला चक्कर आली त्यावेळी लोकल मालाडमध्ये थांबली होती
  • दुर्घटना टळली

Shocking incident in Mumbai local, motorman fainted : मुंबईच्या लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली. चर्चगेट ते बोरिवली असा प्रवास करत असलेल्या लोकलचा मोटरमन चक्कर येऊन पडला. ही घटना लोकल मालाडमध्ये असताना घडली. सुदैवाने मोटरमनला चक्कर आली त्यावेळी लोकल मालाडमध्ये थांबली होती. यामुळे दुर्घटना टळली. 

मालगाडीत लोको पायलट म्हणून काम करणारे मनीष कुमार 24 जानेवारी 2023 पासून मुंबईच्या उपनगरीय रेल्वेच्या सेवेत मोटरमन म्हणून कार्यरत झाले. त्यांना तब्येत बरी नसल्यामुळे चक्कर आली. ही घटना मंगळवार 31 जानेवारी 2023 रोजी दुपारी घडली. 

मंगळवार 31 जानेवारी 2023 रोजी दुपारी अडीच वाजता चर्चगेटहून धीम्या मार्गावरून बोरिवलीच्या दिशेने लोकल रवाना झाली. लोकल साडेतीनच्या सुमारास मालाड स्टेशनमध्ये थांबली. लोकल मालाडमध्ये थांबली असताना चक्कर आल्यामुळे मोटरमन मनीष कुमार त्यांच्या केबिनमध्येच बेशुद्ध पडले. केबिनमधील कॅमेऱ्याचे फूटेज गार्डच्या केबिनमध्ये दिसत होते. यामुळे मोटरमन बेशुद्ध पडल्याची माहिती गार्डने लगेच रेल्वे प्रशासनाला दिली. यानंतर तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. 

मोटरमन मनीष कुमार यांना रक्तदाब कमी झाल्यामुळे चक्कर आली होती. वेळेत वैद्यकीय उपचार झाल्यामुळे मनीष कुमार यांची तब्येत थोड्याच वेळात सावरली. नंतर मोटरमन मनीष कुमार यांना आराम मिळावा यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली. चर्चगेट-बोरिवली गाडी पुढे नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली. मालाडमध्ये घडलेल्या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोटरमनची ड्युटी, त्यांच्या आरामाच्या सोयी आणि कामाचा ताण याबाबत लोकल मोटरमन आणि गार्ड यांच्या वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.

Shocking incident happened in Maharashtra : पतीच्या मृत्यूनंतर नणदेने गळ्यात चपलांचा हार घालून वहिनीची गावातून काढली धिंड

Bus Accident : पुणे सोलापूर महामार्गावर लक्झरी बसचा अपघात, 4 ठार

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी