Murder In Mumbai : मुंबईत धक्कादायक घटना, ज्येष्ठ नागरिकाची केअरटेकरने केली हत्या

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Feb 16, 2023 | 14:38 IST

Shocking incident in Mumbai, senior citizen killed by caretaker : मुंबईत एक धक्कादायक घटना घडली. जोगेश्वरीच्या मेघवाडीत सुधीर चिपळुणकर नावाच्या ज्येष्ठ नागरिकाची केअरटेकर म्हणून काम करत असलेल्या मेल नर्सने (पुरुष नर्सिंग स्टाफ) हत्या केली. मेल नर्सचे नाव पप्पू कोळी असे आहे.

Shocking incident in Mumbai, senior citizen killed by caretaker
मुंबईत ज्येष्ठ नागरिकाची केअरटेकरने केली हत्या  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबईत धक्कादायक घटना
  • ज्येष्ठ नागरिकाची केअरटेकरने केली हत्या
  • हत्या करणाऱ्याला अटक, पोलीस तपास सुरू

Shocking incident in Mumbai, senior citizen killed by caretaker : मुंबईत एक धक्कादायक घटना घडली. जोगेश्वरीच्या मेघवाडीत सुधीर चिपळुणकर नावाच्या ज्येष्ठ नागरिकाची केअरटेकर म्हणून काम करत असलेल्या मेल नर्सने (पुरुष नर्सिंग स्टाफ) हत्या केली. मेल नर्सचे नाव पप्पू कोळी असे आहे.

पप्पू कोळी याने चिपळुणकर यांच्या पत्नीवर, सुप्रिया चिपळुणकर यांच्यावरही चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सुप्रिया चिपळुणकर गंभीर जखमी झाल्या. सुप्रिया यांच्यावर नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

जोगेश्वरीतील घटनेप्रकरणी पोलिसांनी पप्पू कोळी याला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे. चिपळुणकर यांची मुले परदेशात आहेत. यामुळेच चिपळुणकर पतीपत्नीने एका एजन्सीच्या माध्यमातून केअरटेकरला कामावर ठेवले होते. ही नियुक्ती ऑनलाइन पद्धतीने झाली होती. एजन्सीने केअरटेकरचे 'पोलीस व्हेरिफिकेशन' केले होते की नव्हते हे अद्याप समजलेले नाही. 

Weightloss Tips : 1 महिन्यात 10 किलो वजन कमी करा

Weightloss Tips : 1 दिवसात 1 किलो वजन कमी करा

कोण आहे पप्पू कोळी

एजन्सीकडून चिपळुणकर दांपत्याकडे केअरटेकर म्हणून कामासाठी आलेला पप्पू कोळी हा मेल नर्स म्हणून कार्यरत होता. याआधी 2022 मध्ये त्याच्या विरोधात एक बाइक चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र या संदर्भातील माहिती एजन्सीकडून चिपळुणकर दांपत्याला दिली गेली नव्हती. यामुळे चिपळुणकर दांपत्याला पप्प कोळी याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती नव्हती.

मैद्याला रिप्लेस करणारे हेल्दी ऑप्शन

कधी आहे महाशिवरात्र 2023, जाणून घ्या पूजेचा मुहूर्त

लुटीच्या उद्देशाने हत्या

मेल नर्स पप्पू कोळी याने याने लुटीच्या उद्देशाने चिपळुणकर पतीपत्नीवर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात सुधीर चिपळुणकर यांचा मृत्यू झाला आणि सुप्रिया चिपळुणकर गंभीर जखमी झाल्या, असे चिपळुणकर यांच्या नातलगाने सांगितले. सुधीर चिपळुणकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अमेरिकेतून त्यांचा मुलगा सिद्धार्थ आणि इंग्लंडमधून मुलगी सुचेता भारतात आल्याची माहिती पण या नातलगाने दिली. 

चिपळुणकर दांपत्याच्या बाबतीत घडलेल्या प्रकरणात पप्पू कोळी आणि तो ज्या एजन्सीकडून आला ती एजन्सी या दोघांविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी चिपळुणकर यांच्या नातलगांनी केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी