मुंबईत धक्कादायक घटना, परळमध्ये भूमिगत गॅस पाइपलाइनला आग

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Aug 29, 2022 | 14:28 IST

Shocking incident in Mumbai, underground gas pipeline fire in Parel : मुंबईत धक्कादायक घटना घडली. परळ येथे महानगर गॅस कंपनीच्या भूमिगत गॅस पाइपलाइनला आग लागली.

Shocking incident in Mumbai, underground gas pipeline fire in Parel
मुंबईत धक्कादायक घटना, परळमध्ये भूमिगत गॅस पाइपलाइनला आग  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबईत धक्कादायक घटना
  • परळमध्ये भूमिगत गॅस पाइपलाइनला आग
  • जीवितहानी झालेली नाही

Shocking incident in Mumbai, underground gas pipeline fire in Parel : मुंबईत धक्कादायक घटना घडली. परळ येथे पेट्रोल पंपाजवळच्या महानगर गॅस कंपनीच्या भूमिगत गॅस पाइपलाइनला आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वेगाने कारवाई करण्यात आली. आग नियंत्रणात आली आहे. अग्निशमन दलाने कूलिंगची कारवाई सुरू केली आहे.

परळच्या घटनेत जीवितहानी झालेली नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सेंट झेवियर्स मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावर वळविण्यात आली आहे. 

भूमिगत पाइपलाइनमध्ये गळती झाल्यामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणी सखोल चौकशी होणार आहे. आग पूर्ण नियंत्रणात आल्यानंतर आणि कूलिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पाइपलाइनची तपासणी केली जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी