Mumbai: 20 वर्षीय तरुणीवर आजोबा आणि काकांनी केला बलात्कार, 12 वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार

Girl sexually assault by grandfather : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 20 वर्षीय तरुणीवर तिच्या आजोबा आणि काकांनी लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो (Photo: iStock) 
थोडं पण कामाचं
  • मुंबईतील धक्कादायक घटना
  • आजोबा आणि काकांनी केला 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
  • आरोपी आजोबांना पोलिसांनी केली अटक, अद्याप आरोपी काका फरार

Mumbai Crime News: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 20 वर्षीय तरुणीवर तिच्याच आजोबा आणि काकांनी बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत आरोपी आजोबांना अटक केली आहे. तर तिच्या काकांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांचं पथक उत्तरप्रदेशला रवाना झालं आहे. (Shocking news 20 year old girl raped by grandfather and uncle from 12 years crime news marathi)

हे पण वाचा : मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांचा बेमुदत संप

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उत्तरप्रदेशातील ही 20 वर्षीय तरुणी मे महिन्यात महाराष्ट्रात आली होती. तिचे आजोबा मुंबईत राहतात आणि ती त्यांच्यासोबतच राहत होती. ति एका संसर्गजन्य आजाराच्या तपासणीसाठी जेव्हा सरकारी रुग्णालयात पोहोचली त्यावेळी ती तरुणी गरोदर असल्याचं समोर आलं. या संदर्भात द इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा : उद्धव ठाकरेंची जोरदार बॅटिंग, वाचा भाषणातील टॉप 10 मुद्दे​

तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडित मुलगी दोन महिन्यांची गरोरद आहे. ज्यावेळी डॉक्टरांनी ती गरोदर असल्याचं सांगितलं तेव्हा तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. उत्तरप्रदेशात आपल्या काकांनी बलात्कार केल्याची माहिती तिने दिली. इतकेच नाही तर ती जेव्हा मुंबईत आली तेव्हा येथे राहणाऱ्या आजोबांनी सुद्धा तिच्यावर बलात्कार केल्याचा दावा पीडित मुलीने केला आहे.

या प्रकरणात पोक्सो कायद्या अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आजोबांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी म्हणजेच पीडित मुलीच्या काकांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांचं एक पथक उत्तरप्रदेशला गेलं आहे. लवकरच दुसरा आरोपी सुद्धा अटकेत असेल असं पोलिसांनी सांगितलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी