Shraddha Murder Case: मनसे नेते बाळा नांदगावकरांचा संताप, "त्याचा ऑन द स्पॉट एन्काऊंटर करायला हवा"

मुंबई
सुनिल देसले
Updated Nov 17, 2022 | 15:37 IST

MNS leader Bala Nandgaonkar: श्रद्धा हत्या प्रकरणात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी संताप व्यक्त केला आहे. बाळा नांदगावकर यांनी संताप व्यक्त करत आरोपीचा ऑन द स्पॉट एन्काऊंटर करायला हवा असं म्हटलंय. 

Shraddha walkar Murder case mns leader bala nandgaonkar said accused aftab should encounter on the spot read details in marathi
Shraddha Murder Case: मनसे नेते बाळा नांदगावकरांचा संताप, "त्याचा ऑन द स्पॉट एन्काऊंटर करायला हवा" 
थोडं पण कामाचं
  • श्रद्धा हत्या प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ
  • श्रद्धा हत्या प्रकरणात आरोपी आफताबला पोलिसांकडून अटक
  • चौकशीत नवनवीन धक्कादायक माहिती होतेय उघड

Shraddha Walkar Murder Case: संपूर्ण देशाला हादरवून सोडलेल्या Shraddha Walkar हत्या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या आफताब पुनावाला याने श्रद्धाची निर्घृणपणे हत्या केली. इतकेच नाही तर यानंतर आरोपीने तिचे 35 तुकडे केले. त्यानंतर तिच्या शरीराचे केलेले तुकडे हे एक-एक करुन आरोपीने जंगलात फेकून दिले. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय नेत्यांनीही या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सुद्धा या घटनेप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. (Shraddha walker Murder case mns leader bala nandgaonkar said the accused Aftab should encounter on the spot read details in marathi)

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी संताप व्यक्त करत आरोपीचा ऑन द स्पॉट एन्काऊंटर करायला हवा असं म्हटलं आहे. बाळा नांदगावकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, "देशभरात चर्चेत असलेल्या हत्याकांडातील श्रद्धा ही आपल्या महाराष्ट्राची मुलगी आहे. जरी हे प्रकरण दिल्लीतील असेल तरी महाराष्ट्र सरकारने यात विशेष लक्ष देऊन या नराधाम आफताबला लवकरात लवकर फाशी द्यावी. त्यामुळे हे सगळे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे. खरे म्हणजे अशा विकृत लोकांचा "ऑन द स्पॉट" एन्काऊंटर करायला हवा."

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मुंबईला लागून असलेल्या वसईत राहणारी श्रद्धा हिची आफताब पूनावाला नावाच्या तरुणासोबत मैत्री झाली. त्यानंतर या दोघांच्या मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. श्रद्धाने आपल्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. मात्र, तिच्या कुटुंबीयांचा त्याला विरोध होता. पण कुटुंबीयांच्या विरोधानंतरही श्रद्धाने आफताबला भेटणं सुरुच ठेवलं. त्यानंतर तिने घर सोडून आफताबसोबत दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला.

हे पण वाचा : जेवणानंतर गुळ खावा की नाही?

दिल्लीला गेल्यावर श्रद्धा आणि आफताब हे लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत होते. श्रद्धाचे कुटुंबीय तिला लग्नाबाबत वारंवार विचारत होते. त्यानंतर श्रद्धाने सुद्धा आफताबकडे लग्नासाठी विचारणा करण्यास सुरुवात केली. मात्र, आफताब वारंवार लग्नाचा विषय टाळत होता आणि याच विषयावरुन दोघांत भांडणे सुरू झाली.

हे पण वाचा : हिवाळ्यात चुकूनही खाऊ-पिऊ नका हे 6 पदार्थ

लग्नाचा तकादा लावल्याने आफताब याने संतापून श्रद्धाची हत्या केली. इतकेच नाही तर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. हे सर्व तुकडे तिने एका फ्रिजमध्ये ठेवले आणि मग ते तुकडे प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून दररोज रात्रीच्या सुमारास ते बाहेर फेकून येत असे. अखेर या प्रकरणाचा पाच महिन्यांनी पोलिसांनी सुगावा लावला आणि आरोपी आफताबच्या मुसक्या आवळल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी